Shoaib Akhtar Video: सध्या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंची इंग्रजी भाषेवरुन खिल्ली उडवली जात आहे. खिल्ली उडवणे ही वेगळी गोष्ट आहे, पण जेव्हा आपल्याच देशाचे क्रिकेटपटू खिल्ली उडवतात तेव्हा अतिरेक होतो. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने अलीकडेच बाबर आझमची खिल्ली उडवली होती. आता अख्तरने माजी खेळाडू कामरान अकमलच्या इंग्लिशचीही लाइव्ह शोमध्ये खिल्ली उडवली, ज्यामुळे चाहते त्याच्यावर प्रचंड नाराज आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कामरान एका लाईव्ह शोमध्ये बसला होता जिथे अख्तर अँकरसोबत फोनवर संभाषण करत होता. यादरम्यान अख्तरने अँकरला सांगितले की, “कामरान आमच्यासाठी मॅच विनर राहिला आहे, महान खेळाडू आहे, तो तुमच्यासोबत बसला असेल, पण त्याला हे माहित असायला हवे की सकरीन नव्हे तर स्क्रीन असते.”

शोएब अख्तरची ही व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाबर आझमचा अपमान करण्याचा माझा कधीच हेतू नव्हता, असेही शोएबने या संवादादरम्यान सांगितले.

अख्तरच्या या व्हिडिओ क्लिपवर चाहत्यांनी त्याला फटकारले आहे. त्यापैकी एक चाहता म्हणाला, की तो स्वतः वराट बोलतो, तर विराट आहे. अशा परिस्थितीत त्याला इतर कोणावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार नाही. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी शोएब अख्तरच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Women T20 WC 2023: उपांत्य फेरीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; ‘ही’ अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर

बाबर आझमची देखील खिल्ली उडवली होती –

शोएब अख्तरने आपल्या सहकारी खेळाडूंची अशा प्रकारे खिल्ली उडवण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या इंग्रजीची खिल्ली उडवली होती. अशा परिस्थितीत आता अख्तरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय शोएब अख्तरही अनेकदा त्याच्या अनेक वक्तव्यामुळे चर्चेत असतो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Screen is not sakreen shoaib akhtar mocked kamran akmal in live show vbm