मेलबर्न : सेह सु वेई आणि एलिसे मेर्टेन्स या जोडीने ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतील महिला दुहेरीचे विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात त्यांनी जेलेना ओस्टापेन्को आणि ल्युडमिला किचेनॉक जोडीचा ६-१, ७-५ असा पराभव केला. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुहेरीत विजेतेपद मिळवणारी ३८ वर्षीय वेई ही दुसरी सर्वात वयस्क टेनिसपटू ठरली. मार्टिना नवरातिलोवाने २०११मध्ये वयाच्या ४९व्या वर्षी बॉब ब्रायनच्या साथीने अमेरिकन खुल्या स्पर्धेत मिश्र दुहेरीचे विजेतेपद मिळवले होते.मेर्टेन्सचे या स्पर्धेतील हे दुसरे विजेतेपद ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यापूर्वी तिने अरिना सबालेन्काच्या साथीत २०२१ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. विशेष म्हणजे त्याच वर्षी मेर्टेन्सने सेहच्या साथीने विम्बल्डनचे विजेतेपदही मिळवले होते.मेर्टन्सने २०१९ मध्ये अमेरिकन स्पर्धेतही दुहेरीत विजेतेपद मिळवले आहे. नव्या जागतिक क्रमवारीतील दुहेरीत आता मेर्टेन्स महिलांमध्ये अव्वल स्थानावर येईल. यापूर्वी २०२१ मध्ये मेर्टेन्स २८ आठवडे अव्वल स्थानावर होती.