* आयपीएल फिक्सिंग प्रकरण
‘इंडियन प्रीमिअर लीग’च्या(आयपीएल) मागील मोसमात झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे(बीसीसीआय) अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांच्यावर सर्वाच्च न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. श्रीनिवासन जोपर्यंत बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आहेत, तोपर्यंत स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची नि:पक्षपती चौकशी होऊ शकणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
त्याचबरोबर न्यायाधीश मुदगल समितीने सर्वोच्च न्यायालयात बंद पाकिटातून सादर केलेल्या अहवालात गंभीर आरोप आहेत त्यामुळे श्रीनिवासन पद सोडण्यास तयार नसतील, तर तसा आदेश द्यावा लागेल असे सर्वोच्च न्यायालयाने श्रीनिवासन यांना खडे बोल सुनावले आहेत.
या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या गुरूवारी होणार आहे. न्यायालयाने श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मयप्पन याला स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी ठरविले आहे. तसेच मयप्पन चेन्नईचा मालक असल्याचेही मान्य केले आहे. त्यामुळे चेन्नई संघावरही नामुष्की ओढावण्याची शक्यता आहे. क्रिकेट स्वच्छ ठेवायचे असेल, तर श्रीनिवास यांनी स्वत:हून पायउतार व्हायला हवे असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर आता बीसीसीआयच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ट्विटरकरांच्या प्रतिक्रिया-