जवळपास चार वर्षांपूर्वी सीन अबॉट या खेळाडूचा उसळी खाणारा चेंडू लागून ऑस्ट्रेलियन खेळाडू फिलिप ह्युजेस याचा मृत्यू ओढावला होता. अर्थात यामध्ये अबॉटची काही चुक नसल्यामुळे त्या दुर्दैवी घटनेबाबत कुणीही त्याला जबाबदार धरलेले नव्हते. अचानक इतक्या वर्षांनंतर अबॉट आणि ह्युजेसचा उल्लेख होण्यांचं कारण, पुन्हा तशाच प्रकारची दुर्घटना होता होता टळली आहे. मुख्य म्हणजे यावेळीसुद्धा अबॉटच गोलंदाजी करत होता.
रविवारी ऑस्ट्रेलियामध्ये शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील न्यू साऊथ व्हेल्स आणि व्हिक्टोरिया या दोन संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात अबॉटने फलंदाजाला आखुड टप्प्याचा चेंडू टाकला. जो त्या फलंदाजाच्या हेल्मेटवर जाऊन लागला. चेंडूचा फटका लागल्याने अखेर नाईलाजास्तव त्या खेळाडूला मैदानातून काढता पाय घ्यावा लागला. अबॉटचा चेंडू लागल्यानंतर तो फलंदाज गुडघ्यांवर बसला, त्याला पाहून लगेचच संघाच्या वैद्यकीय विभागातील काहीजणांनी येऊन लगेचच त्याची मदत केली. हा सर्व प्रकार पाहता अनेकांनाच फिलिप ह्युजेस या खेळाडूसोबत घडलेल्या त्या दुर्दैवी प्रसंगाची आठवण झाली.
मैदानावर घडलेला हा सर्व प्रसंग पाहून अबॉटचं लक्ष विचलीत झाल्याचं अनेकांनीच पाहिलं. त्याने या सर्व परिस्थितीतून सावरण्यासाठी काही वेगळही घेतला. त्यानंतर अॅरॉन फिंचने येऊन अबॉटला धीर देण्याचा प्रयत्न केला. पण, त्या काही मिनिटांमध्ये अबॉटच नव्हे तर मैदानात उपस्थित अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता हे खरं.
वाचा : २०१९ विश्वचषकानंतर निवृत्तीचा निर्णय घेईन – युवराज सिंह
चार वर्षांपूर्वीचा तो दुर्दैवी प्रसंग…