तीन वेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या सिबॅस्टिन वेटेलने बहरीन ग्रां. प्रि. शर्यतीत अव्वल स्थान पटकावले. चुरशीच्या लढतीत जॅकी स्टेवर्टला मागे टाकत वेटेलने अव्वल स्थानावर कब्जा केला.
वेटेलचे गेल्या चार शर्यतीतील दुसरे विजेतेपद आहे. त्याचे हे कारकिर्दीतील २८ वे अजिंक्यपद आहे. वेटेलला शर्यतीत दुसरी पोल पोझिशन होती. त्याने तिसऱ्या फेरीच्या वेळी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती टिकविली. फ्रान्सच्या रोमेन ग्रोसजेन याने तिसरे स्थान पटकाविले. इंग्लंडच्या पॉल डीरेस्टा याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गतवर्षी वेटेल, स्टेवर्ट व ग्रोसजेन यांनीच येथे अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले होते. २००८ चा विजेता लेविस हॅमिल्टन याला पाचवा क्रमांक मिळविताना झगडावे लागले. मेक्सिकनच्या सर्जी पेरेझ याला सहावा क्रमांक मिळाला.
पोलिस आणि शिया समर्थक यांच्यात झालेल्या संघर्षांमुळे या शर्यतीवर भीतीचे सावट होते. मात्र प्रचंड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याने स्पर्धेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या अव्वल जेतेपदासह सार्वकालिन ग्रां.प्रि. जेतेपदांच्या मांदियाळीत जॅकी स्टुअर्टला मागे टाकत सहावे स्थान पटकावले आहे.
ही शर्यत सुरेख झाली. संपूर्ण स्पर्धेत मला साथ देणाऱ्या माझ्या संघाचे मला आभार मानायचे आहेत. मी अनपेक्षित वेग घेतला होता. माझ्या गाडीनेही चांगली साथ दिली. आम्ही गाडीच्या चाकांची योग्य देखभाल घेतली आणि त्याचे फळ आम्हाला मिळाले असे वेटेलने जेतेपद पटकावल्यानंतर बोलताना सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा