विश्वविजेत्या सेबॅस्टीयन वेटेलने रेड बुल संघाच्या मार्क वेबेरवर निसटती मात करीत मलेशियन ग्रां. प्रि. मोटार शर्यतीत विजेतेपद पटकाविले. त्याचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे २७ वे विजेतेपद ठरले.
बेवरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मर्सिडीज संघाच्या माजी विश्वविजेत्या लेविस हॅमिल्टन याने तिसरे स्थान पटकाविले. त्याचाच सहकारी निको रोसबर्ग याने चौथा क्रमांक मिळविला. फेरारी संघाच्या फेलिप मासा याला अपेक्षेइतकी कामगिरी करता आलेली नाही. त्याला पाचवा क्रमांक मिळाला. दोन वेळा विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या फर्नाडो अलोन्सोला दुसऱ्याच फेरीनंतर शर्यत सोडावी लागली.

Story img Loader