India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारी (दि. १७ फेब्रुवारी) दिल्ली येथे सुरुवात होणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक ऑस्ट्रेलिया संघाच्या पारड्यात पडली. यावेळी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत भारतीय संघ १-०ने आघाडीवर आहे. उस्मान ख्वाजाने मारलेला फटका इतका दमदार होता की त्याला कधी वाटले नसते की इतका सुरेख झेल भारताचा स्टार खेळाडू केएल राहुल पकडेल.

केएल राहुलचा सूर मारत अफलातून झेल

पीटर हँड्सकॉम्ब आणि उस्मान ख्वाजा यांनी पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. ख्वाजा हळूहळू शतकाच्या जवळ येत होता. त्याचबरोबर हँड्सकॉम्बही चांगली खेळी करत आहे. या दोघांच्या उत्कृष्ट भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियन संघ सामन्यात कायम आहे असे वाटत असतानाच मागच्या सामन्यातील स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने आपल्या जादुई फिरकीच्या जोरावर उस्मान ख्वाजाला बाद केले. पण त्यात केएल राहुलचा खूप मोठा वाटा आहे कारण ख्वाजाच्या रिव्हर्स स्वीप शॉटवर पॅाईंटवर उजव्या बाजूला हवेत सूर मारत अफलातून झेल पकडला. काही क्षणांसाठी ख्वाजाला देखील विश्वास बसत नव्हता. धोकादायक दायक होत असलेला उस्मान ख्वाजा शतकापासून वंचित राहिला. त्याच्या या बाद होण्याने ऑस्ट्रेलियन संघ संकटात सापडला आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द

केएल राहुलने घेतलेल्या एका हाताने पकडलेल्या अप्रतिम झेलने ख्वाजाला पूर्णपणे आश्चर्यचकित केले. आऊट झाल्यानंतर उस्मान ख्वाजाचा यावर विश्वासच बसला नाही आणि तो गुडघे टेकून बसला. हा झेल भारतासाठी गेम चेंजर ठरू शकतो. आऊट झाल्यानंतर उस्मान ख्वाजा स्वत:ला अत्यंत दुर्दैवी समजेल. केएल राहुलच्या फलंदाजीतील अपयश थांबण्याचे नाव घेत नसले तरीही तो कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. नवी दिल्ली कसोटीत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी राहुलला पुन्हा एकदा शुबमन गिलपेक्षा पसंती दिल्याने तो टीकाकारांच्या नजरेत आला. पण क्षेत्ररक्षण करताना त्याने अप्रतिम झेल घेत चाहत्यांची मने जिंकली.

विकेट गमावल्यानंतर ख्वाजा निराश झाला

ख्वाजाला १२५ चेंडूत ८१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. पहिल्या दिवशी चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १९९/६ आहे. पीटर हँड्सकॉम्ब ३६ आणि पॅट कमिन्स २३ धावा करून खेळत आहेत. दोघेही चांगली फलंदाजी करत असून दोघांमध्ये ३१ धावांची भागीदारी आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ या सामन्यात कायम आहे. भारताकडून अश्विनने तीन, शमीने दोन आणि जडेजाने एक विकेट घेतली आहे.

जडेजाने त्याचा २५०वा कसोटी बळी घेतला

उस्मान ख्वाजा हा रवींद्र जडेजाच्या कसोटी कारकिर्दीतील २५०वा बळी ठरला. कारकिर्दीतील ६२वी कसोटी खेळताना त्याने हे शानदार प्रदर्शन केले. अनेक अर्थांनी ख्वाजाची विकेट जडेजासाठी संस्मरणीय ठरली आहे. यामध्ये राहुलची भूमिका महत्त्वाची होत. एक फिरकीपटू म्हणून अष्टपैलू कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. याआधी कपिल देव आणि इतर सगळे खेळाडू हे वेगवान गोलंदाज म्हणून अष्टपैलू कामगिरी करणारे उदयास आले होते. मात्र फिरकीपटू म्हणून अशी कामगिरी करणारा कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून तो पहिलाच ठरला आहे.