पुढच्या वर्षी अव्वल जागतिक क्रमवारीत अव्वल दहा खेळाडूंमध्ये धडक मारायची आहे, असे उद्गार बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपने काढले. गेली अनेक वर्षे बॅडमिंटन क्षेत्रात कश्यप सातत्याने चांगली कामगिरी करीत होता. मात्र आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे जेतेपद त्याला हुलकावणी देत होते. मात्र नुकत्याच लखनौ येथे झालेल्या सय्यद मोदी ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत परुपल्ली कश्यपने कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या ग्रां. प्रि. जेतेपदावर नाव कोरले. या जेतेपदाने अतिशय आनंद झाल्याचे कश्यपने सांगितले.
‘‘यंदाचा हंगाम माझ्यासाठी सवरेत्कृष्ट ठरला आहे. याचवर्षी मी लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली. पुढच्या वर्षीही मला कामगिरीत सातत्य राखायचे आहे. ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धा तसेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे पदक मला खुणावत आहे’’, असे कश्यपने सांगितले.
‘‘यावर्षी पोटाच्या दुखापतीने मला चांगलेच सतावले. माझे फिजिओ तसेच प्रशिक्षक गोपीचंद सर यांच्यामुळेच मी दुखापतीतून लवकर सावरलो. दुखापतींचे व्यवस्थापन या मुद्यावर मला लक्ष केंद्रित करायचे आहे,’’ असे कश्पय म्हणाला.     

Story img Loader