Theft at Lahore’s Gaddafi Stadium: पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२३ मध्ये चोरीचे एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. पीएसएलवर लक्ष ठेवण्यासाठी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये लावलेले, आठ सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला गेले आहेत. एवढेच नाही तर सुरक्षा कॅमेऱ्यांशिवाय चोरट्यांनी फायबर केबल्स आणि जनरेटरच्या बॅटऱ्याही पळवून नेल्या. लाइव्ह रेकॉर्डिंग आणि मॉनिटरिंगसाठी हे सर्व साहित्य अत्यंत महत्त्वाचे होते. चोरीला गेलेल्या साहित्यांची किंमत लाखो रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार, या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. गुलबर्ग पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तसेच तपास अधिकाऱ्यांच्या अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे. गद्दाफी स्टेडियममधील चोरीच्या घटनेनंतर सोशल मीडियावर लोक आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत.

Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
pakistan google search indian movie 1
भारतीय चित्रपट व वेब सीरिजचं पाकिस्तानला वेड; बॉलीवूडचे ‘हे’ सिनेमे सीमेपल्याड ठरले सुपरहिट, पाहा यादी
Kurla accident case CCTV from bus seized Mumbai news
कुर्ला अपघात प्रकरणः बसमधील सीसीटीव्ही ताब्यात, २५ जणांचा जबाब नोंदवला
Pushpa 2 Movie News
Pushpa 2 : ‘पुष्पा 2’ हजार कोटींच्या क्लबमध्ये, इतकी बक्कळ कमाई करणारे आणखी सहा चित्रपट कुठले?
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Mumbai, gold, silver , Accused arrested with gold,
मुंबई : १९ कोटींच्या सोन्या, चांदीसह आरोपीला अटक
Cylinder explosion in Badlapur one injured
Cylinder explosion : बदलापुरात सिलेंडरचा स्फोट, एक जखमी

अधिक लोक प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत आहेत. कडेकोट बंदोबस्त असतानाही चोरटे इतके बेधडक कसे झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
एकीकडे स्टेडियममध्ये चोरीची घटना घडली आहे. दुसरीकडे पंजाब सरकार आणि पीसीबी यांच्यात पीएसएल सामन्यांच्या सुरक्षेच्या खर्चाच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे.

हेही वाचा – AUSW vs SAW Final: महिला टी-२० विश्वचषक फायनल सामना कधी, कुठे आणि केव्हा पाहता येणार? घ्या जाणून

अशा स्थितीत लाहोर आणि रावळपिंडी येथे होणाऱ्या पीएसएल सामन्यांच्या आयोजनावर टांगती तलवार आहे. खरं तर, पंजाब सरकारने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सुमारे ४५० दशलक्ष पाकिस्तानी रुपये देण्यास सांगितले होते.मात्र, सरकारने सुरक्षा निधीची रक्कम २५० दशलक्ष पाकिस्तानी रुपयांवर आणली आहे. सरकार आणि मंडळाचे शिष्टमंडळ यांच्यात झालेल्या चर्चेतूनही काही निष्पन्न झाले नाही.

हेही वाचा – IND vs AUS 3rd Test: केएल राहुलच्या संघातील स्थानाबद्दल रवी शास्त्रीचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘जर उपकर्णधार…’

पीएसएलचे सामने सुरू असून, या मोसमातील १५ वा सामना रविवारी होणार आहे. या स्पर्धेत एकूण ३४ सामने खेळवले जाणार आहेत. पाकिस्तान अनेक मुद्द्यांवर आपले घाणेरडे काम करत राहतो, यावेळीही असेच काहीसे घडले.

Story img Loader