Sediqullah Atal hitting seven sixes in one over: सध्या अफगाणिस्तानमध्ये काबुल प्रीमियर लीग (केपीएल २०२३) खेळली जात आहे. या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या एका सामन्यात अफगाणिस्तानचा युवा डावखुरा फलंदाज सेदिकुल्लाह अटलने आपल्या फलंदाजीने सर्वांना केले. त्याने एकाच षटकात ६ नाही तर ७ षटकार मारले. त्याने गोलंदाज अमीर जझाईच्या षटकातील प्रत्येक चेंडू सीमारेषेपलीकडे टोलवला.
हा पराक्रम काबूल प्रीमियर लीगच्या १०व्या सामन्यात पाहिला मिळाला. ज्यामध्ये शाहीन हंटर्सचा सामना आबासिन डिफेंडरशी होत होता. सेदीकुल्लाहने या सामन्यात नाबाद ११८ धावा केल्या, त्याने ५६ चेंडूंच्या या खेळीत ७ चौकार आणि १० षटकार लगावले.
या सामन्यात आबासिन डिफेंडरनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा निर्णयही योग्य वाटत होता, कारण त्यांच्या गोलंदाजांनी केवळ २९ धावांत ३ बळी घेतले होते. पण चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या कर्णधार सेदीकुल्लाने प्रथम संघाचा डाव सावरला आणि नंतर स्फोटक खेळी खेळली. सेदीकुल्लाने या वर्षी पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली आहे.
सेदीकुल्लाह अटलनेही झळकावले शतक –
डावाच्या १८व्या षटकाच्या अखेरपर्यंत सेदीकुल्लाह ७१ धावांवर नाबाद होता. संघाने १८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर इश्मतुल्ला हबीबीची (६) विकेट गमावली, हा शाहीन हंटर्स संघाला सहावा धक्का होता. पण १९ व्या षटकात अमीर जझाईने आपल्या कोट्यातील शेवटचे षटकण्यासाठी आला होता. त्याच्या या षटकात सेदीकुल्लाने ४८ धावा कुटत त्याची अवस्था खराब केली.
हेही वाचा – IND vs WI 2nd ODI: ‘…म्हणून रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती दिली’; हार्दिक पांड्याने सांगितले कारण
एका षटकात कुटल्या ४८ धावा –
पहिला चेंडू – नो बॉल – षटकार (एकूण ७ धावा)
पहिला चेंडू – वाइड – चौकार (एकूण ५ धावा)
पहिला चेंडू – षटकार
दुसरा चेंडू – षटकार
तिसरा चेंडू – षटकार
चौथा चेंडू – षटकार
पाचवा चेंडू – षटकार
सहावा चेंडू – षटकार
ऋतुराज गायकवाडनेही मारले होते एका षटकात ७ षटकार –
भारताचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड यानेही एका षटकात ७ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर २०२२-२३ विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध हा पराक्रम केला होता. महाराष्ट्राचा फलंदाज गायकवाडने शिवा सिंगच्या नो बॉलसह एकूण ७ चेंडूत ७ षटकार मारून आश्चर्यकारक कामगिरी केली.