भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग सध्या सोशल मीडियावर आपल्या ट्विटमुळे चर्चेत आहे. सेहवागने आज त्याच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले, त्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. सेहवाग त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो तसेच तो त्याच्या स्पष्टवक्तेपणा साठी सुद्धा ओळखला जातो. खुलेआम फलंदाजीसारखे तो ट्विट करतो यामुळे तो अनेकवेळा ट्रोलही झाला आहे. शेअर बाजारातील भारतीय कंपनीची ढासळलेली स्थिती पाहून वीरूने एक ट्विट केले, ज्यानंतर चाहत्यांनी त्याला आपले सर्व पैसे त्या स्टॉकमध्ये गुंतवून स्टॉक वाचवण्याचा सल्ला दिला. मात्र, सेहवागने आपल्या ट्विटमध्ये कोणत्याही कंपनीचे नाव घेतले नाही.

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील हिंडेनबर्ग अहवालाने भारतीय शेअर बाजाराला मोठा धक्का दिला आहे. या खुलाशानंतर गौतम अदानी यांच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली असून त्याचा परिणाम बाजारावर झाला आहे. दरम्यान, गौतम अदानी यांना टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा पाठिंबा मिळाला आहे. माजी सलामीवीराने नाव घेतले नसले तरी तो अदानीबद्दल बोलत असल्याचा अंदाज त्याच्या ट्विटरवरून लावता येतो.

वीरेंद्र सेहवागने ट्विट करून म्हटले आहे की, “भारताची प्रगती गोर्‍यांना सहन होत नाही. भारतीय बाजारपेठेला लक्ष्य करणे हे एक विचारपूर्वक केलेले कारस्थान असल्याचे दिसते. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी भारत पूर्वीपेक्षा मजबूत होईल.” लीजेंड्स लीग क्रिकेट (LLC) मधील अदानी समूहाच्या गुजरात जायंट्स संघाच्या कर्णधाराचे हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अशा परिस्थितीत आत्मविश्वास खचू देता कामा नये

वीरेंद्र सेहवागच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की, “भारत मजबूत आहे, सर, अदानी कमजोर झाला आहे.” दुसर्‍या यूजरने लिहिले, “सर, तुमच्या फलंदाजीत मोठी धार आहे, पण तुम्ही चमचे आहात.” आणखी एका युजरने गौतम अदानी यांचा फोटो शेअर करत लिहिले की, या महापुरुषाची हिंमत खचू देऊ नका. एका यूजरने लिहिले की, “भाऊ, तुमचे सर्व पैसे अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये टाका आणि गोर्‍यांना द्या. प्रेरणा देणाऱ्या ४ ओळी लिहून काहीही होणार नाही. आणखी एका युजरने विचारले, “सरजी आपके कितने शेयर है अदानी ग्रुप में.”

हेही वाचा: Tanya Hemanth: सुवर्णपदक घेताना हिजाब अनिवार्य! इराणच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या शटलर बाबतीत घडला विचित्र प्रकार

वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो

वीरेंद्र सेहवाग खूप निर्भयपणे फलंदाजी करायचा. कसोटी क्रिकेट असो की वन डे क्रिकेट, त्याने गोलंदाजांना सोडले नाही. पहिल्या चेंडूपासूनच धावा काढण्याचा प्रयत्न करायचा. नेमकी अशीच स्टाईल त्याच्या सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वीरेंद्र सेहवाग सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याचे ट्विट लोकांना खूप आवडते. नुकतेच त्यांनी ट्विट करून विचारले होते की, कोणाला सर्वात जास्त भीती वाटते. यानंतर त्याच्यात आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये मजेदार संवाद झाला.

Story img Loader