बीसीसीआयमध्ये माझी कोणतीही सेटींग नसल्यामुळे मला प्रशिक्षक बनता आलं नाही, या विरेंद्र सेहवागच्या वक्तव्याचा माजी खेळाडू सौरव गांगुलीने चांगलाच समाचार घेतला आहे. सौरव गांगुली हा बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य आहे, या समितीकडे भारताच्या क्रिकेट निवडीचे अधिकार सोपवण्यात आलेले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अवश्य वाचा – बीसीसीआयमध्ये कोणतीही ‘सेटिंग’ नव्हती म्हणून कोच झालो नाही-सेहवाग

“सेहवागच्या वक्तव्यावर मला काहीही बोलायचं नाही. तो मुर्खासारखा बडबडला आहे”, असं म्हणत गांगुलीने सेहवागच्या वक्तव्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विरेंद्र सेहवागने, बीसीसीआयमध्ये आपली सेटींग नसल्यामुळे मी प्रशिक्षक बनू शकलो नाही असं वक्तव्य केलं होतं. बीसीसीआयमधील काही अधिकाऱ्यांनी मला प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रियेसंदर्भात चुकीची माहिती दिल्याचा गौप्यस्फोटही सेहवागने केला होता. त्यामुळे सेहवागच्या या वक्तव्यावर बीसीसीआय काय प्रतिक्रीया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं.

मात्र गांगुलीने या सेहवागच्या या वक्तव्याला फारसं महत्व न देण्याचं ठरवलं आहे. सेहवागने केलेल्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारे तथ्य नसल्याचं सांगत या प्रकरणी आपण अधिक प्रतिक्रिया देणार नाही असंही गांगुलीने स्पष्ट केलंय. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतला दुसरा सामना हा कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच २१ सप्टेंबरला हा सामना खेळवला जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sehwag spoke foolishly says former indian captain sourav ganguly