वीरेंद्र सेहवाग, झहीर खान आणि हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंसाठी भारतीय संघाचे दार कायमसाठी बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बीसीसीआयतर्फे करारबद्ध करण्यात येणाऱ्या खेळाडूंच्या यादीतून या अनुभवी खेळाडूंना डच्चू देण्यात आला आहे. वाढते वय, ढासळता फॉर्म, दुखापतींनी त्रस्त असलेल्या या खेळाडूंना वगळण्यात आल्यामुळे यापुढे निवड समितीचे युवा खेळाडूंना निवडण्याचे धोरणही अधोरेखित झाले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी तसेच एकदिवसीय मालिकेसाठी या तिघांना स्थान देण्यात आले नव्हते.
बीसीसीआयने २०१३-२४ वर्षांसाठी करारबद्ध करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. गेल्या वर्षी या यादीत ३७ खेळाडूंना सामावून घेण्यात आले होते, मात्र या वेळी २५ जणांची निवड केली आहे. ‘अ’ श्रेणीत केवळ पाच खेळाडू आहेत. २००व्या कसोटीनंतर निवृत्त होणाऱ्या सचिन तेंडुलकरचा या श्रेणीत समावेश आहे. दरम्यान, खराब फॉर्मशी झगडणाऱ्या गौतम गंभीर आणि युवराज सिंगची गच्छंती ‘ब’ श्रेणीत करण्यात आली आहे.

Story img Loader