Team India Selection Committee Chairman Ajit Agarkar Press Conference : भारतीय क्रिकेट संघ लवकरच श्रीलंकेला रवाना होणार आहे. टीम इंडिया रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांची सोमवारी पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत अजित आगरकर यांनी हार्दिक पंड्या ऐवजी सूर्यकुमार यादवला भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार का बनवले? यावर प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर हार्दिक पंड्याला कर्णधारपदापासून दूर का केले? यावर प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हार्दिक अजूनही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू –

निवडसमितीचे अध्यक्ष अजित आगरकर म्हणाले, “हार्दिक पंड्या अजूनही आमच्यासाठी महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. मात्र, त्याच्यासाठी फिटनेस खरोखरच आव्हानात्मक आहे. अशा स्थितीत प्रशिक्षक, निवडकसमिती आणि संघ व्यवस्थापनाला ते थोडे अवघड जाते. पुढील टी-२० विश्वचषकापूर्वी आमच्याकडे बराच वेळ आहे. अशा परिस्थितीत, आम्हाला काही गोष्टी प्रयोग करून पहायच्या आहेत. कारण त्यावर सर्वकाही अवलंबून आहे, परंतु हार्दिक अजूनही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे.”

केवळ फिटनेसच नाही तर सूर्यामध्ये यशस्वी कर्णधार होण्याची क्षमता –

अजित आगरकर पुढे म्हणाले, “केएल राहुलच्या जागी हार्दिक जेव्हा कर्णधार झाला, तेव्हा मी निवडसमितीचा अध्यक्ष नव्हतो. जेव्हा मी निवडसमितीचा अध्यक्ष झालो, तेव्हा एकदिवसीय विश्वचषक जवळ येत होता आणि त्यानंतर लगेचच टी-२० विश्वचषक होता. हार्दिकसाठी फिटनेस ही समस्या आहे. केवळ फिटनेसच नाही तर सूर्यामध्ये यशस्वी कर्णधार होण्याची क्षमता जास्त आहे, असे आम्हाला वाटते. दोन वर्षे म्हणजे खूप मोठा कालावधी आहे आणि या परिस्थितीत आपल्याकडे वेगवेगळे प्रयोग करुण पाहण्यासाठी बराच वेळ आहे.”

हेही वाचा – पॅरिसला लष्करी तळाचे स्वरूप

जे खेळाडू नेहमीच उपलब्ध असतात त्यांना जास्तीत जास्त संधी –

निवडसमितीचे अध्यक्ष म्हणाले, “जे खेळाडू आमच्यासाठी नेहमीच उपलब्ध असतात त्यांना जास्तीत जास्त संधी द्यायची आहे. या भूमिकेत आम्ही हार्दिकला अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो, असे आम्हाला वाटते. त्याने टी-२० विश्वचषकात ज्या प्रकारे अष्टपैलू प्रदर्शन केले, ते सर्वांनी पाहिली. अशा परिस्थितीत त्याची कामगिरी संघासाठी महत्त्वाची आहे, ना की कर्णधारपदाचा मुद्दा नाही.”

हेही वाचा – ENG vs WI 2nd Test : इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला ‘हा’ मोठा पराक्रम

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा टी-२० संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selection committee chairman ajit agarkar explains why hardik pandya was denied india t20i captaincy vbm
Show comments