दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशने (डीडीसीए) शनिवारी आगामी रणजी हंगामासाठी तीन संभाव्य संघांची घोषणा केली. डीडीसीएच्या या कारभारामुळे आणखी एका वादाला तोंड फुटले आहे.
डीडीसीएच उपाध्यक्ष चेतन चौहान आणि सरचिटणीस अनिल जैन या दोघांनीही प्रसारमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या संभाव्य संघांची यादी जाहीर केली. त्यात अशोक शर्मा (संचालक) यांनीही आणखी एक यादी जाहीर करून नवा पेच निर्माण केला. चौहान यांच्या यादीत कर्णधारपद कोणालाही देण्यात आले नाही, परंतु त्यांनी मदन लाल यांची मार्गदर्शक म्हणून निवड केली आहे. जैन यांनी गंभीरला कर्णधार घोषित केले आहे, तर शर्मा यांनी काही वर्षांपूर्वी एका खाजगी वाहिनीने केलेल्या आयपीएल स्पॉट-फिक्सिंग स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडलेल्या खेळाडूंची नावे संभाव्य संघात टाकली आहेत. या तिन्ही यादीमध्ये गंभीर, विराट कोहली, शिखर धवन आणि इशांत शर्मा ही नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा