Mukesh kumar selection in team india: बीसीसीआयने शुक्रवारी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. यामध्ये बीसीसीआयने वनडे आणि कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला प्रथमच टीम इंडियात स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याला दोन्ही संघात स्थान मिळाले आहे. कोलकात्याजवळील एका छोट्या गावातून आलेल्या या खेळाडूला पदार्पणाची संधी मिळू शकते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रदीर्घ काळ शानदार कामगिरी करणारा मुकेश यंदा प्रथमच आयपीएल खेळला.

वडिलांच्या मदतीसाठी मुकेश कुमार कोलकात्यात आला –

मुकेश कुमार २०१२ मध्ये कोलकाता येथे आला होता. कारण त्याच्या वडिलांच्या टॅक्सी व्यवसायाचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, वडिलांच्या इच्छेविरुद्ध, त्याने द्वितीय श्रेणी लीगमध्ये सामने खेळण्यास सुरुवात केली, जिथे त्याला ४००-५०० रुपये मिळायचे. मुकेशच्या वडिलांनी त्याला क्रिकेटसाठी फक्त एक वर्ष दिले होते.

IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज

वडिलांनी एक वर्ष दिले होते –

मुकेश म्हणाला, “माझ्या वडिलांनी मला एक वर्ष दिले होते आणि सांगितले की, या काळात काही झाले नाही तर मला त्यांच्यासोबत काम करावे लागेल. परंतु त्यांना माहित होते की मला क्रिकेटमध्ये रस आहे.” त्यानंतर मुकेशने स्वत:ला सिद्ध केले आणि हळूहळू बंगालच्या स्थानिक संघाचा कणा बनला. मुकेशची भारतासाठी निवड झाल्यावर त्याच्या कारकिर्दीला आता नवी दिशा मिळाली आहे.

हेही वाचा – IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ जाहीर! बीसीसीआयने उमेश-शमीला वगळत ‘या’ युवा खेळाडूंना दिली संधी

मुकेश कुमारला शमीची मदत झाली –

मुकेशने सांगितले की, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याला ड्यूक आणि कुकुबुरा बॉलसह गोलंदाजी करण्यात मदत केली. शमीने मुकेशला सांगितले की, इंग्लंडमध्ये लेंथवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. शमीच्या मदतीमुळे मुकेशला खूप मदत झाली. त्याचबरोबर मुकेश आयपीएलमध्ये महागात ठरत असतानाही शमीने त्याला समजावले होते.

मुकेश कुमारने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “आम्ही गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबादमध्ये खेळत होतो. शमी भाई मला म्हणाले की आयपीएलमध्ये गोलंदाजांना धावा पडतात, पण तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे आहे. चार षटकात ६० धावा जाऊ शकतात हे लक्षात ठेवा. त्यानंतर माझ्या मनातून भीती निघून गेली होती.”

हेही वाचा – Virat Kohli: वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी विराट पत्नी अनुष्कासोबत नेदरलँड्समध्ये घेतोय सुट्टीचा आनंद, फोटो होतोय व्हायरल

रिकी पाँटिंगने व्यक्त केला होता विश्वास –

मुकेश कुमार हा यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा नेट बॉलर होता. यादरम्यान त्याने दोन सराव सामने खेळले होते. या दरम्यान त्याने संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगला आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. गेल्या मोसमापासून दिल्लीला तो संघात हवा होता, असे मुकेशने सांगितले. यावेळी लिलावात मुकेशसाठी चेन्नई सुपर किंग्सशी झुंज दिली आणि या गोलंदाजाला ५.५ कोटी रुपयांना करारबद्ध केले.

Story img Loader