मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिरांसाठी विविध ठिकाणी निवड चाचणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी निर्धारित दिवशी क्रिकेटच्या गणवेशात आपल्या नजीकच्या केंद्रात जावे.
१४ वर्षांखालील गटासाठी १ सप्टेंबर २००० ते ३१ ऑगस्ट २००२ या कालावधीत जन्मलेले विद्यार्थी पात्र असतील. १६ वर्षांखालील गटासाठी १ सप्टेंबर १९९८ ते ३१ ऑगस्ट २००० या कालावधीत जन्मलेले विद्यार्थी पात्र ठरतील. १९ वर्षांखालील गटासाठी १ सप्टेंबर १९९५ ते ३१ ऑगस्ट १९९८ या कालावधीत जन्मलेले विद्यार्थी पात्र होतील.
१४ वर्षांखालील मुले
*दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन, ओव्हल मैदान (कुलाबा ते परळ आणि चर्चगेट ते लोअर परळ)
*भारत सीसी (एलफिन्स्टन ते माहिम)
*दादर युनियन स्पोर्टिग क्लब, दडकर मैदान माटुंगा (परळ ते सायन आणि शिवडी कोळीवाडा)
*खार जिमखाना (वांद्रे ते विलेपार्ले)
*गोरेगाव स्पोर्ट्स क्लब (अंधेरी ते मालाड)
*एसआरटी जिमखाना, महावीर नगर, कांदिवली (प.) (कांदिवली ते दहिसर)
*चॅम्पियन्स क्रिकेट क्लब, सुदामा नगर, भाईंदर (प.) (मीरा रोड ते भाईंदर)
*चिमाजी अप्पा स्टेडियम, वसई (नायगाव ते वसई)
*विरार क्रीडा विकास मंडळ, विरार (प.) (नालासोपारा ते वसई)
*टाटा एसएलएल, बोईसर (वैतरणा ते बोईसर)
*रिलायन्स, डहाणू (डहाणू आणि नजीकचा परिसर)
*चेंबूर जिमखाना (चेंबूर/ कुर्ला ते भांडुप)
*बीएआरसी, ट्रॉम्बे (मानखुर्द/ ट्रॉम्बे)
*डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम, नेरूळ (वाशी ते बेलापूर/ पनवेल)
*आम्ही मुलुंडकर, मुलंड जिमखाना, मुलुंड (पश्चिम) (मुलुंड ते दिवा)
*केडीएमसी मैदान, वायले नगर, कल्याण (कल्याण/ बदलापूर/खर्डी)
*भिवंडी स्टेडियम (भिवंडी आणि नजीकचा परिसर)
*जोशी हायस्कूल, डोंबिवली (डोंबिवली आणि नजीकचा परिसर)
एमसीएतर्फे क्रिकेट प्रशिक्षण शिबिरांसाठी निवड चाचणीचे आयोजन
मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिरांसाठी विविध ठिकाणी निवड चाचणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-04-2014 at 04:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selection test for mca cricket training camp