Gautam Gambhir Explosive Statement On Team India : भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. गंभीरने म्हटलंय की, हार्दिक पांड्याच्या जागेवर बॅकअप म्हणून शार्दुल ठाकूरला संघात सामील करणं चूकीचा निर्णय आहे. शार्दुलच्या जागी शिवम दुबेचा संघात समावेश करणं योग्य निर्णय ठरला असता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गौतम गंभीरने प्रतिक्रिया देत म्हटलं, “शिवम दुबेसारख्या खेळाडूचा निवडकर्त्यांनी आशिया चषकासाठी विचार करायला पाहिजे होता. कारण तो खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तुम्हाला हार्दिक पांड्याच्या बॅकअपची आवश्यकता आहे. पण शार्दुल ठाकूर तो बॅकअप असू शकत नाही. शिवम दुबेची आशिया चषकासाठी टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये निवड व्हायला पाहिजे होती.

नक्की वाचा – चांद्रयान-३ मोहिम यशस्वी होताच टीम इंडियाने डब्लिनमध्ये केला जल्लोष, BCCI ने शेअर केला खेळाडूंचा सुंदर व्हिडीओ

शिवम दुबेने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानंतर भारतीय संघातही त्याची निवड झाली. सध्याच्या घडीला तो आर्यलँड दौऱ्यावर आहे आणि दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने खूप चांगली कामगिरी केली होती. दुबे आर्यलँड विरोधात होणाऱ्या सामन्यांमध्ये गोलंदाजीही करत आहे. त्याला पार्ट टाईम गोलंदाज म्हणून जबाबदारी देण्यात आलीय. शिवम दुबेनं भारतासाठी जेव्हा पदार्पण केलं होतं, तेव्हा त्याला एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान मिळालं होतं. परंतु, त्यानंतर त्याची कामगिरी इतकी चांगली राहिली नाही.

आशिया चषकासाठी भारताच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये के एल राहुल आणि श्रेयस अय्यरसारख्या खेळाडूंचं पुनरागमन झालं आहे. नुकतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तिलक वर्मालाही आशिया चषकासाठी संधी देण्यात आलीय. याशिवाय शार्दूल ठाकूरला अष्टपैलू खेळाडू म्हणून टीम इंडियात सामील करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Selectors should have included shivam dube instead of shardul thakur for asia cup 2023 team india squad nss
Show comments