टीम इंडियाच्या आगामी झिम्बाब्वे दौऱयासाठी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यासह इतर वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे धोनीला वेस्ट इंडिजमधील तिरंगी मालिकेमध्ये विश्रांती देण्यात आली आहे. पुढील झिम्बाब्वे दौऱयापर्यंत तो तंदुरुस्त होईल का, हे तूर्ततरी स्पष्ट नसल्यामुळे त्याला पुढील दौऱयाला विश्रांती देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. झिम्बाब्वे दौऱयासाठी शुक्रवारी भारतीय संघाची निवड होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजेता संघ सुरुवातीला वेस्ट इंडिजमधील तिरंगी मालिकेसाठी कायम ठेवण्यात आला होता. मात्र, धोनी दुखापतग्रस्त झाल्यानंतर संघाचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी विराट कोहलीकडे देण्यात आली. पुढील स्पर्धेसाठीही धोनी उपलब्ध झाला नाही, तर कोहलीकडेच नेतृत्त्व कायम राहण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जवळपास सर्वच भारतीय क्रिकेटपटू सातत्याने क्रिकेट खेळताहेत. त्यामुळे काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याची चर्चा जोर धरू लागलीये. गौतम गंभीरला पुन्हा संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. निवड समिती त्याला संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक ते दोन खेळाडूंना विश्रांती देऊन त्याऐवजी नव्या चेहऱय़ांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Story img Loader