भारतीय टेनिस संघातील खेळाडूंनी डेव्हिस चषक लढतीवर बहिष्कार घालण्याची धमकी दिल्यानंतर अखिल भारतीय टेनिस महासंघाने विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
खेळाडूंच्या मागणीबाबत महासंघाने दिलेला प्रस्ताव खेळाडूंनी फेटाळला होता. तसेच आगामी डेव्हिस चषक लढतीत सहभागी न होण्याचा इशारा दिला होता. महासंघाने पर्यायी भारतीय संघाचीही निवड केली आहे मात्र खेळाडूंची बहिष्काराची धमकी लक्षात घेऊनच त्यांनी तीन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कार्यकारिणी बैठकीत नवीन समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायाधीश किंवा शासकीय अस्थापनामधून निवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच या समितीत एका ज्येष्ठ टेनिसपटूचाही समावेश केला जाणार आहे.

Story img Loader