‘एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी..’ या सर्जनशील कवी सुधीर मोघे यांच्या लोभसवाण्या ओळी गेल्या रविवारी दोन दिग्गजांनी सार्थ ठरवल्या. दोघांचेही जीवनप्रवास अगदी भिन्न. पण यंदा परिस्थितीने दोघांना अनपेक्षितपणे कारकीर्दीत समान अशा विवक्षित वळणावर उभं केलं. त्या वळणावरून कारकीर्दीचा शेवट दृष्टिक्षेपात होता. पण कारकीर्द अशी थांबणं दोघांनाही मंजूर नव्हतं. खेळणं जिंकण्यासाठीच असतं. जिंकता आलं नाही की आजूबाजूचे कटाक्ष बोचरे होत जातात. हे दोघे अशा कटाक्षांनाही सरावले होते. सगळं जिंकून झालंय, आता आनंदासाठी खेळतो असंही दोघांनी सांगून बघितलं. पण जेतेपदांना समानार्थी शब्द झालेली त्यांची नावं त्यांना स्वस्थ बसू देईनात. टीकाकारांसाठी नाही, मात्र स्वत:ची परीक्षा म्हणून त्यांनी पण केला. दिवास्वप्न वाटावं असा तो पण त्यांनी गेल्या रविवारी प्रत्यक्षात साकारला. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या चाहत्यांच्या दुवा फलद्रूप झाल्या आणि पस्तिशीत त्या दोघांनी ग्रँडस्लॅम जेतेपद नावावर केलं. ‘वाढतं वय म्हणजे मर्यादा’ या समजाला आपल्या भन्नाट ‘सव्र्हिस’ने कोर्टबाहेर भिरकावून देणारे ते दोघं म्हणजे सेरेना विल्यम्स आणि रॉजर फेडरर. विक्रम, आकडेवारी, प्रचंड धनराशी हे ओघानं आलंच; परंतु त्याहीपेक्षा ऊर्जावान नव्या पिढीलाही तडाखा देण्याची क्षमता आजही असल्याचं त्यांनी सिद्ध केलं. पुरुषाने रडू नये असा अलिखित संकेत असतानाही फेडररच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू आणि ताकदवान गुणवैशिष्टय़ांमुळे ‘पुरुषी महिला खेळाडू’ असं हिणवल्या जाणाऱ्या सेरेनाच्या डोळ्यांतले अश्रू दोघांच्या यशातला साम्य योगायोग. ऐतिहासिक जेतेपदानंतर दोघांनीही कारकीर्दीचा शेवट आता दिसू लागलाय असं सूतोवाच केलं. ते थांबणं आशयघन असेल, अपूर्ण नाही.
फिरुनी नवे जन्मू आम्ही!
‘एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी..’
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-02-2017 at 00:40 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serena williams and roger federer