जेतेपदाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्सने आपापल्या लढती जिंकत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. अन्य लढतींमध्ये लि ना, समंथा स्टोसूर यांनीही विजयी सुरुवात केली. यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या सेरेना विल्यम्सने विम्बल्डन मोहिमेची दणक्यात सुरुवात केली. विम्बल्डनची पाच विक्रमी जेतेपदे नावावर असणाऱ्या अग्रमानांकित सेरेनाने लक्सेमबर्गच्या मँडी मिनेलाचा ६-१, ६-३ असा धुव्वा उडवत सलग ३२व्या विजयाची नोंद केली.
अमेरिकेतील लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भात दिलेल्या वक्तव्यामुळे सेरेनावर जोरदार टीका झाली होती. कट्टर प्रतिस्पर्धी मारिया शारापोव्हाने सेरेनावर शाब्दिक हल्लाबोल केला होता. या सगळ्यानंतर सेरेनाने आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली होती. मात्र या मैदानाबाहेरील वादाचा स्वत:च्या खेळावर अजिबात परिणाम होऊ न देता सेरेनाने नेहमीच्या वर्चस्वाने विजय साकारला.
३१ वर्षीय सेरेनाने भात्यातील सर्व फटक्यांचा प्रभावी उपयोग करत मिलेनाला निष्प्रभ केले. जागतिक क्रमवारीत ९२व्या स्थानी असलेल्या मिलेनाला सेरेनाच्या तडाखेबंद खेळाचा प्रसाद मिळाला. शेवटच्या ७८ लढतींत सेरेनाचा हा ७५वा विजय आहे. सलग किती सामने जिंकले आहे याचा मी विचार करत नाही. प्रत्येक सामना हा माझ्यासाठी नवीनच असतो. गतविजेती म्हणून विजयी सलामी करण्याचा माझा प्रयत्न होता. तो यशस्वी झाल्याने आनंदी असल्याचे सेरेनाने सांगितले.
अव्वल मानांकित जोकोव्हिचने जर्मनीच्या फ्लोरियन मेयरवर ६-३, ७-५, ६-४ असा विजय मिळवत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. जोकोव्हिचने ३४व्या मानांकित मेयरची पहिलीच सव्र्हिस भेदली. यानंतर जोकोव्हिचने संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखले. फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपांत्य फेरीत राफेल नदालकडून पराभूत झालेल्या जोकोव्हिचने ग्रासकोर्टवर आपल्या लौकिलाला साजेसा खेळ करत दिमाखदार सुरुवात केली.
अन्य लढतींमध्ये चीनच्या लि ना ने विम्बल्डन प्रवासाची विजयी सुरुवात केली. लि नाने नेदरलँण्ड्सच्या मायकेला क्रॅजिसेकवर ६-१, ६-१ असा दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूरने स्लोव्हाकियाच्या अॅना शिमीडेलोव्हाला ६-१, ६-३ असे नमवले.
पुरुषांमध्ये अर्जेटिनाचा ज्युआन मार्टिन डेल पोट्रोने स्पेनच्या अल्बर्ट रामोसवर ६-२, ७-५, ६-१ असा विजय मिळवला. जपानच्या केई निशिकोरीने ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू इब्डेनचा ६-२, ६-४, ६-३ असा पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिविज शरण-पुरव राजा जोडीचे आव्हान संपुष्टात
लंडन : लिएण्डर पेस, महेश भूपती आणि रोहन बोपण्णा या त्रिकुटाव्यतिरिक्त दिविज शरण-पुरव राजा जोडीला ग्रँडस्लॅम पदार्पणाची संधी मिळाली होती. मात्र सलामीच्या लढतीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
या पराभवामुळे दिविज-पुरवची विम्बल्डन वारी अल्पावधीतच संपुष्टात आली आहे. दोन सेट जिंकत दिविज-पुरव जोडीने शानदार सुरुवात केली. सामन्यावर कब्जा करण्यासाठी या जोडीला आणखी एक सेट जिंकण्याची आवश्यकता होती, मात्र ग्रँडस्लॅम व्यासपीठावर पहिल्यांदाच खेळत असलेल्या या जोडीने पुढच्या तिन्ही सेटसह सामना गमावला.
अमेरिकेच्या निकोलस मोनरो आणि सिमोन स्टॅडलर या जोडीने दिविज-पुरवला ६-७, २-६, ६-३, ६-४, ६-४ असे नमवले. १९ पैकी १५ ब्रेकपॉइंट्स वाचवण्यात आलेले अपयश दिविज-पुरव जोडीच्या पराभवाचे कारण ठरले. तिसऱ्या सेटमध्ये दिविज-पुरव जोडीची सव्र्हिस भेदण्यात प्रतिस्पध्र्यानी दोनदा यश मिळवले.
 ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळण्याचा अनुभव नसल्यामुळे या जोडीने महत्त्वाच्या क्षणी गुण गमावले. शेवटच्या सेटमध्येही त्यांना ३ ब्रेकपॉइंट्स मिळाले, मात्र त्याचा त्यांना उपयोग करून घेता आला नाही. सलामीच्या लढतीत पराभूत होऊनही या जोडीने दिलेली झुंज कौतुकास्पद होती. यंदाच्या हंगामात सातत्यपूर्ण प्रदर्शन केल्यामुळेच या जोडीला ग्रँडस्लॅम पदार्पणाची संधी मिळाली होती.