वर्षांतली शेवटची ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा अर्थात अमेरिकन खुल्या स्पर्धेसाठी मानांकने जाहीर करण्यात आली असून, पुरुषांमध्ये नोव्हाक जोकोव्हिच तर महिलांमध्ये सेरेना विल्यम्स यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. वर्षांतील चारही ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर करत ‘कॅलेंडर ग्रँड स्लॅम’चा विक्रम पूर्ण करण्याची संधी सेरेनाला आहे. गेली तीन वर्षे सेरेनानेच या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. रोमानियाच्या सिमोन हालेपला द्वितीय तर मारिया शारापोव्हाला तृतीय मानांकन देण्यात आले आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला आणि विम्बल्डनच्या जेतेपदावर कब्जा करणारा जोकोव्हिच या स्पर्धेतही जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. अमेरिकन खुल्या स्पर्धेची पाच जेतेपदे नावावर असणाऱ्या रॉजर फेडररला द्वितीय मानांकन देण्यात आले आहे. अँडी मरेला तृतीय मानांकन बहाल करण्यात आले आहे. दुखापती आणि खराब फॉर्मच्या फेऱ्यात अडकलेल्या राफेल नदालला आठवे तर गतविजेता मारिन चिलीचला नववे मानांकन देण्यात आले आहे. उपविजेत्या जपानच्या केई निशिकोरीला चौथे तर फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या विजेत्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्काला पाचवे मानांकन देण्यात आले आहे.

Story img Loader