अनपेक्षित निकालांना दूर ठेवत नोव्हाक जोकोविच व सेरेना विल्यम्स या अव्वल मानांकित खेळाडूंबरोबरच इंग्लंडच्या अँडी मरेने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. जपानच्या केई निशिकोरी याने सव्वाचार तासांच्या झुंजीनंतर पाचव्या मानांकित मिलोस राओनिक याच्यावर रोमहर्षक विजय नोंदविला.
जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित जोकोविच याने जर्मनीच्या फिलीप कोहेलश्रेबर याच्यावर ६-१, ७-५, ६-४ अशी मात केली व सलग आठव्यांदा या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. निशिकोरी याने उत्कंठापूर्ण लढतीत कॅनडाच्या २३ वर्षीय राओनिकला ४-६, ७-६ (७-४), ६-७ (६-८), ७-५, ६-४ असे हरविले. आठव्या मानांकित मरेने फ्रान्सच्या जो विल्फ्रेड त्सोंगाला ७-५, ७-५, ६-४ असे पराभूत करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तृतीय मानांकित स्टॅनिस्लास वॉवरिन्क या स्वित्र्झलडच्या खेळाडूने स्पेनच्या टॉमी रॉब्रेडो याचा ७-५, ४-६, ७-६ (९-७), ६-२ असा पराभव केला.
धक्कादायक निकालांची लाट थोपवत सेरेना हिने इस्तोनियाच्या काया कानेपी हिचे आव्हान ६-३, ६-३ असे सहज संपुष्टात आणले. ३२ वर्षीय सेरेनापुढे इटलीच्या फ्लेविया पेनेट्टाचे आव्हान असणार आहे. पेनेट्टाने ऑस्ट्रेलियाच्या कॅसी डेलियाक्वावर ७-५, ६-२ अशी मात केली. १६व्या मानांकित व्हिक्टोरिया अझारेन्काने सर्बियाच्या अॅलेक्झांड्रा क्रुनिक हिला ४-६, ६-४, ६-४ असे हरविले. पहिला सेट गमावल्यानंतर सव्र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवत अझारेन्का हिने विजयश्री खेचून आणली. सातवी मानांकित एवगेनी बुचार्ड हिला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. रशियाच्या एकतेरिना माकारोवा हिने तिच्यावर ७-६ (७-२), ६-४ अशी मात केली. माकारोवाला १७वे मानांकन आहे.
अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविच, सेरेना उपांत्यपूर्व फेरीत
अनपेक्षित निकालांना दूर ठेवत नोव्हाक जोकोविच व सेरेना विल्यम्स या अव्वल मानांकित खेळाडूंबरोबरच इंग्लंडच्या अँडी मरेने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 03-09-2014 at 01:11 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serena williams novak djokovic through to quarters in us open