फ्रेंच ओपन स्पर्धेतून सेरेना विल्यम्सने दंडाला झालेल्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे. मारिया शारापोव्हाविरुद्ध सामना सुरु होण्याआधीच सेरेनाला दंडाचा त्रास जाणवायला लागला. यानंतर सेरेनाने निवृत्तीचा माघार घेण्याचा निर्णय घेतला. मारिया शारापोव्हाविरुद्ध खेळणं मला नेहमी आवडतं. मात्र आताच्या घडीला मला खेळणं शक्य होणार नसल्याचं सेरेनाने स्पष्ट केलं.

“सामना अर्धवट सोडवा लागत असल्याचं मला प्रचंड वाईट वाटत आहे. माझ्या परिवाराला आणि मुलीला वचन देऊन मी मैदानात उतरले होते. मात्र अशा पद्धतीने मला माघार घ्यावी लागेल याचा मी विचारही केला नव्हता.” भावुक झालेल्या सेरेनाने पत्रकारांशी संवाद साधला. याआधीच्या सामन्यांमध्येही सेरेनाला दंडाचा त्रास जाणवत होता. सेरेनाने स्पर्धेतून माघार घेतल्यामुळे शारापोव्हाने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.