सेरेना विल्यम्सने डब्ल्यूटीए अजिंक्यपद स्पर्धेत जेतेपद कायम राखले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सने चीनच्या लि नाने २-६, ६-३, ६-० अशी मात केली आणि जेतेपदावर नाव कोरले. यंदाच्या वर्षांतला सेरेनाचा हा ७८वा विजय आहे तर ११वे जेतेपद आहे. लि नाने पहिला सेट जिंकत शानदार सुरुवात केली मात्र त्यानंतर सेरेनाने आपला सारा अनुभव पणाला लावत लि ना पुढील दोन सेटमध्ये धुव्वा उडवला.

Story img Loader