जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सने हॉपमन चषक टेनिस स्पर्धेच्या सलामीच्या लढतीतून माघार घेतली आहे. वर्षांतील पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेसाठी तयारी म्हणून सेरेनासाठी ही स्पर्धा महत्त्वाची होती. मात्र गुडघ्याच्या दुखापतीमुळे सेरेनाने या सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मिश्रसांघिक असे या स्पर्धेचे स्वरुप असते. २१ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असलेली सेरेना ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम स्पर्धेचे जेतेपद कायम राखण्यासाठी उत्सुक आहे. सेरेनाच्या ऐवजी विकी दुवालला संधी देण्यात आली. दरम्यान अमेरिकेच्या ऑस्ट्रेलिया गोल्डविरुद्धच्या लढतीत सेरेना खेळण्याची शक्यता आहे.
सेरेनाची सलामीच्या लढतीतून माघार
ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेसाठी तयारी म्हणून सेरेनासाठी ही स्पर्धा महत्त्वाची होती
First published on: 05-01-2016 at 06:10 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serena williams withdraws from hopman cup