जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सेरेना विल्यम्सने हॉपमन चषक टेनिस स्पर्धेच्या सलामीच्या लढतीतून माघार घेतली आहे. वर्षांतील पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेसाठी तयारी म्हणून सेरेनासाठी ही स्पर्धा महत्त्वाची होती. मात्र गुडघ्याच्या दुखापतीमुळे सेरेनाने या सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. मिश्रसांघिक असे या स्पर्धेचे स्वरुप असते. २१ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असलेली सेरेना ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम स्पर्धेचे जेतेपद कायम राखण्यासाठी उत्सुक आहे. सेरेनाच्या ऐवजी विकी दुवालला संधी देण्यात आली. दरम्यान अमेरिकेच्या ऑस्ट्रेलिया गोल्डविरुद्धच्या लढतीत सेरेना खेळण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा