जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू सेरेना विल्यम्स हिने मियामी ओपन टेनिस स्पर्धेत सहाव्यांदा विजेतेपद पटकाविले. तिने अंतिम लढतीत द्वितीय मानांकित मारिया शारापोवा हिला ४-६, ६-३, ६-० असे पराभूत केले. कारकिर्दीत सेरेनाचे हे ४८ वे एटीपी विजेतेपद आहे.
सेरेना हिने यापूर्वी येथे २००२ ते २००४, २००७ व २००८ मध्ये अजिंक्यपद मिळविले होते. तिने शारापोवावर सलग अकरावा विजय मिळविला. तिने ऑलिम्पिकमध्येही शारापोवास पराभूत करीत सुवर्णपदक जिंकले होते. त्याखेरीज विम्बल्डन व अमेरिकन स्पर्धेतही तिने अंतिम लढतीत शारापोवास विजेतेपदापासून वंचित ठेवले होते.
सहाव्यांदा विजेतेपद मिळविले असले तरी प्रत्येक विजेतेपद मला सुखकारक असते. मारियाने चांगली लढत दिली. पहिल्या सेटमध्ये मी सव्र्हिसवर अपेक्षेइतके नियंत्रण राखू शकले नाही. तिसऱ्या सेटमध्ये माझा खेळ खूपच सफाईदार झाला. या सेटमध्ये चिवट लढत मिळेल असे वाटले होते, मात्र मारियाची खूपच दमछाक झाली होती. शारापोव्हावर गेल्या ११ सामन्यांमध्ये सातत्याने विजय मिळवत आली आहे, त्यामुळे या लढतीपूर्वी तिच्या खेळाचा मी चांगला अभ्यास केला होता. या सामन्यात माझ्याकडूनही काही चुका झाल्या, पण त्या चुकांमधून शिकून मी पुन्हा सामन्यात परतले. सामन्यात एका क्षणी मला फार थकल्यासारखे वाटत होते, त्या वेळी व्यवस्थित दम घेऊन चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला.
सेरेना विल्यम्स, महिला टेनिसपटू.
सेरेनाचा विजेतेपदाचा षटकार
जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित खेळाडू सेरेना विल्यम्स हिने मियामी ओपन टेनिस स्पर्धेत सहाव्यांदा विजेतेपद पटकाविले. तिने अंतिम लढतीत द्वितीय मानांकित मारिया शारापोवा हिला ४-६, ६-३, ६-० असे पराभूत केले. कारकिर्दीत सेरेनाचे हे ४८ वे एटीपी विजेतेपद आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-04-2013 at 02:05 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Serena winner sixth time