सेवाकर विभागाबरोबरच्या कायदेशीर लढाईमध्ये आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पूर्णपणे चीतपट झाल्याचे समोर येत आहे. गेल्या दहा वर्षांमधील प्रसारण हक्क आणि स्वामित्व हक्क शुल्कांच्या मिळकतींवर बीसीसीआयने सेवाकर भरलेला नाही. याबाबत गेल्या दहा वर्षांमध्ये सेवाकर विभागाने बीसीसीआयला १९ कारणे दाखवा नोटिसा बजावलेल्या आहेत.
बीसीसीआयचे खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी वार्षिक अहवालाबरोबर (२०१३-१४) एक अतिरिक्त अहवाल जोडला असून, यामध्ये त्यांनी सेवाकर विभागाची बीसीसीआयला मिळालेली कारणे दाखवा आणि कर मागणी करणारी नोटीस आहे. २००४-०५ ते २०१२-१३ या वर्षांमधील ५३६.१३ कोटी रुपयांचा सेवाकर बीसीसीआयने भरलेला नाही.

Story img Loader