इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत १-०ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने पुढील दोन सामन्यात दमदार पुनरागमन केलं. दुसरा आणि तिसरा कसोटी सामना जिंकून भारताने मालिकेत २-१ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडच्या संघाला विजय मिळवणं अनिवार्य आहे. सामन्यात दमदार कामगिरी करण्याच्या दृष्टीने सारेच खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. पण त्यातच इंग्लंडला एक धक्का बसला आहे. इंग्लंडचा एक स्टार खेळाडू क्रिकेट बोर्डाच्या नियमामुळे मालिकेतून माघार घेऊन मायदेशी परतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Ind vs Eng: खेळपट्टीचा वाद ऐन रंगात असताना गावसकरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...

इंग्लिश क्रिकेट बोर्डाने सध्या सर्व खेळाडूंसाठी रोटेशन पॉलिसी राबवली आहे. प्रत्येक खेळाडूला विश्रांती मिळावी म्हणून काही खेळाडूंना संघातून वगळणं आणि काहींना मालिकेसाठी किंवा सामन्यासाठी विश्रांती देणं अशी ती पॉलिसी आहे. या पॉलिसीनुसार, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स याने चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे. वोक्स दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि भारत या तिन्ही दौऱ्यांसाठी इंग्लंडच्या चमूमध्ये होता. पण त्याला तिन्ही दौऱ्यात अंतिम ११मध्ये संधी मिळाली नाही. अखेर गुरूवारी वोक्स मायदेशी परतला.

Ind vs Eng: “भारताने सामना जिंकला, पण…”; इंग्लंडच्या माजी कर्णधाराचं मत

वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स

असा रंगला तिसरा कसोटी सामना

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत आटोपला. त्यात केवळ झॅक क्रॉलीने अर्धशतक केले. तर अक्षर पटेलने ३८ धावांत ६ बळी टिपले. त्यानंतर भारताचा पहिला डावही स्वस्तात संपला. रोहितच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला कशीबशी १४५ धावांपर्यंत मजल मारणं शक्य झालं. कर्णधार जो रुटने अवघ्या ८ धावा देत ५ गडी टिपले. इंग्लंडचा दुसरा डावही लवकर संपुष्टात आला. अक्षरचे ५ तर अश्विनचे ४ बळी यांच्या जोरावर इंग्लंड ८१ धावांत गारद झाला. त्यानंतर चौथ्या डावात भारताने बिनबाद विजयासाठी आवश्यक असलेलं लक्ष्य गाठलं. सामन्यात ११ बळी टिपणारा अक्षर पटेल सामनावीर ठरला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Setback for england cricket team before 4th test fast bowler chris woakes pulled out of remainder ind vs eng test series vjb
Show comments