नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सात पदकविजेत्या खेळाडूंचा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात समावेश करण्यात आला आहे. इन्चेनॉन, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी दहा सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
१२ वेटलिफ्टिंगपटूंनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांवर नाव कोरले. विशेष म्हणजे एकही भारतीय वेटलिफ्टिंगपटू उत्तेजक चाचणीत दोषी आढळला नाही. हीच स्वच्छ प्रतिमा आशियाई क्रीडा स्पर्धेत जपण्यासाठी भारतीय वेटलिफ्टिंगपटू उत्सुक आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी स्वतंत्र निवड चाचणी घेण्यात आलेली नाही. ३ जून रोजी घेण्यात आलेल्या निवड चाचणीच्या आधारे संघाची निवड करण्यात आली. राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा या दोन स्पर्धादरम्यान खूपच कमी कालावधी असल्याने स्वतंत्र निवड चाचणी घेण्यात आली नाही, असे भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक हंसा शर्मा यांनी सांगितले. भारतीय संघ : पुरुष- सुखेन डे (५६ किलो), रुस्तुम सारंग (६२ किलो), सतीश शिवालिंगम (७७ किलो), के.रवी कुमार (७७ किलो), विकास ठाकूर (८५ किलो). महिला : खुमकचाम संजीता चानू (४८ किलो), सईकोम मीराबाई चानू (४८ किलो), पूनम यादव (६३ किलो), वंदना गुप्ता (६३ किलो) आणि कविता देवी (७५
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या संघात सात राष्ट्रकुल पदकविजेत्यांचा समावेश
नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये सात पदकविजेत्या खेळाडूंचा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या संघात समावेश करण्यात आला आहे.
First published on: 21-08-2014 at 01:00 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven commonwealth medal winners included in asian games teams