Shahid Afridi on Harmanpreet Kaur: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या बांगलादेशमध्ये झालेल्या गैरवर्तणुकीप्रकरणी पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य समोर आले आहे. भारत विरुद्ध बांगलादेश (IND W vs BAN W) सामन्यात हमरनप्रीतच्या या वागण्यामुळे, ICC ने तिला या आधीच खूप मोठी शिक्षा दिली आहे. त्याचवेळी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने याबाबत बोलताना हा अतिरेक असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला, “आक्रमकता आटोक्यात ठेवली पाहिजे आणि आयसीसीने या प्रकरणी अशी शिक्षा द्यावी जेणेकरून भविष्यासाठी एक उदाहरण सर्वांसमोर ठेवता येईल, जेणेकरून सर्वांना चाप बसेल.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समा टीव्हीवर बोलताना आफ्रिदी म्हणाला, “हे फक्त भारताबाबत नाही. तर अनेक देशांच्या खेळाडूंकडून यापूर्वी घडताना पाहिले आहे. मात्र, महिला क्रिकेटमध्ये आपण हे सहसा पाहत नाही, परंतु जे झाले ते निंदनीय अशा स्वरूपाचे होते. तो भारत विरुद्ध बांगलादेश सामना हा आयसीसीचा मोठा कार्यक्रम होता. यामध्ये, या घडलेल्या घटनेवर मोठ्या शिक्षेद्वारे आपण भविष्यासाठी एक आदर्श ठेवू शकता.” आफ्रिदी पुढे म्हणाला, “तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर आक्रमकता दाखवू शकता, पण ती आक्रमकता नियंत्रित स्वरुपाची आणि संघाच्या भल्यासाठी असायला हवी आणि ती चांगली असते. मात्र हे जरा अतीच झालं असून त्यामानाने दिलेली शिक्षा ही कमीच आहे.”

हेही वाचा: Syazrul Idrus: सियाजरुल इद्रासने रचला इतिहास! टी२० क्रिकेटमध्ये ७ विकेट्स घेत मोडला भारताच्या ‘या’ खेळाडूचा विक्रम

विशेष म्हणजे, भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसर्‍या एकदिवसीय सामन्यादरम्यान हरमनप्रीत कौरने फलंदाजीदरम्यान अंपायरच्या निर्णयावर नाराज होऊन स्टंपच्या दिशेने जोरात बॅट भिरकावली आणि त्यामुळे स्टंपवरील बेल्स पडल्या. त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जाताना तिने अंपायर्सशी हुज्जत घातली आणि स्टेडियममधील प्रेक्षकांना अंगठा देखील दाखवला. हा सामना टाय झाला त्यामुळे मालिका देखील १-१ अशी बरोबरीत सुटली. त्याचवेळी सामना संपल्यानंतर हरमनप्रीत कौरने प्रसारकांशी बोलताना अंपायरिंगवर प्रश्न उपस्थित केले. याशिवाय बांगलादेशी खेळाडूंसोबत ट्रॉफी शेअर करताना तिने उपरोधिकपणे अंपायरलाही बोलावण्यास सांगितले.

हेही वाचा: Ishant Sharma: “विराट कोहलीमुळे झहीर खानची कारकीर्द संपली”, इशांत शर्माच्या खुलाशाने क्रिकेट विश्वात उडाली खळबळ

हरमनप्रीत कौरवर २ सामन्यांची बंदी

हरमनप्रीत कौरच्या कृतीची दखल घेत, आयसीसीने तिला लेव्हल २ च्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले. यानंतर त्याच्यावर मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यासोबतच त्याच्या खात्यात ३ डिमेरिट पॉइंट्सही जमा झाले. याशिवाय आंतरराष्ट्रीय सामन्यात घडलेल्या घटनेवर जाहीरपणे टीका केल्याबद्दलही हरमनप्रीतला लेव्हल १ मध्ये दोषी ठरवण्यात आले होते. यासाठी त्याला त्याच्या मॅच फीच्या २५ टक्के दंड आणि दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली. त्यामुळे एकूण ७५ टक्के मॅच फी रक्कम कापली गेली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Severe punishment should be given by icc shahid afridi furious over harmanpreet kaurs behavior avw