आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहाना ही सध्या चर्चेत आहे. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत तिने केलेल्या ट्विटमुळे सध्या तिच्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या आहेत. देशात शेतकरी आंदोलन सुरू असल्याने राजकीय वातावरण काहीसं गरम आहे. अशातच रिहानाने केलेल्या ट्विटमुळे या आंदोलनाची जागतिक पातळीवर दखल घेण्यास सुरूवात झाली. रिहानाच्या ट्विटनंतर अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी या आंदोलनाची दखल घेत आपलं मत मांडलं. याच रिहानाचा सध्या एक जुना व्हिडीओ नव्याने व्हायरल होत आहे.
IND vs ENG: एक नंबर… पहिल्याच कसोटीत जसप्रीत बुमराहचा विश्वविक्रम!
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याच्यासोबतचा रिहानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. २०१९मधील हा व्हिडीओ आहे. रिहाना आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कार्लोस ब्रेथवेट हे वर्गमित्र आहेत. त्यामुळे रिहानाची त्याच्याशी चांगली मैत्री आहे. त्याच्या ओळखीनेच रिहानाला वेस्ट इंडिजच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश मिळाला होता. २०१९ मध्ये झालेल्या वन डे विश्वचषकाच्या वेळी रिहाना ड्रेसिंग रूममध्ये आली होती. त्यावेळी तिने ख्रिस गेलसोबत फोटो काढला होता आणि बॅटवर त्याची स्वाक्षरीदेखील घेतली होती. हाच जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतो आहे.
पाहा व्हिडीओ-
When @rihanna met the Universe Boss #CWC19 | #MenInMaroon pic.twitter.com/a5lt6fVIFx
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 1, 2019
Video: बाबोsssss गेलने कुटल्या २२ चेंडूत ८४ धावा
दरम्यान, रिहानाने शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर तिचं समर्थन करणारे आणि तिला विरोध करणारे असे दोन गट ट्विटर आणि इतर सोशल मीडियावर दिसत आहेत.