Shadab Khan completes 200 international wickets: आशिया कप २०२३ मध्ये भारताविरुद्ध सुपर फोर फेरीत पाकिस्तानला २२८ धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात पाकिस्तान संघाच्या उपकर्णधाराला विशेष कामगिरी करता आली. या सामन्यात शादाबने फक्त एक विकेट घेतली पण तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० बळी पूर्ण करण्यात यशस्वी झाला. या सामन्यात शादाबने भारतीय कर्णधार रोहित शर्माला आपला आऊट केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शादाब खानला त्याच्या खराब फॉर्ममुळे बऱ्याच दिवसांपासून टीकेला सामोरे जावे लागत आहे. भारताविरुद्धच्या सामन्यातही त्याने १० षटकांत ७१ धावा दिल्या होत्या. मात्र, २०० आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्यानंतर शादाबला पाकिस्तानी ड्रेसिंग रूममध्ये विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

पाकिस्तानसाठी शादाब खानने आतापर्यंत ६३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३२.५४ च्या सरासरीने ८२ बळी घेतले आहेत. शादाबच्या नावावर ९२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०४ बळी आहेत. याशिवाय त्याला ६ कसोटी सामने खेळण्याचीही संधी मिळाली असून त्यात तो १४ विकेट्स घेण्यास यशस्वी झाला आहे. मात्र शादाबनेही आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले असून त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यात ४, कसोटीत ३ आणि टी-२० मध्ये १ अर्धशतकी खेळी आहे.

हेही वाचा – Virat Kohli: १४ वर्षांपासून भेटीची वाट पाहत असलेल्या चाहत्याचे विराटने स्वप्न केले पूर्ण, पाहा व्हायरल VIDEO

पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध खेळायचा महत्त्वाचा सामना –

आशिया चषक २०२३ मध्ये भारताविरुद्ध २२८ धावांनी झालेल्या दारुण पराभवामुळे पाकिस्तानचा नेट रनरेट लक्षणीयरीत्या खालावला आहे. यानंतर आता अंतिम फेरी गाठण्यासाठी श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा सुपर फेरीतील सामना जिंकणे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तथापि, हा सामना पावसामुळे व्यत्यय आणू शकतो आणि जर सामना रद्द झाला, तर श्रीलंका संघ चांगल्या नेट रनरेटमुळे अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करण्यात यशस्वी होईल.

हेही वाचा – सचिन तेंडुलकरने टाकली अशी गुगली की चाहते झाले बोल्ड, क्रिकेटच्या ‘या’ प्रश्नांची तुमच्याकडे आहेत का उत्तरं?

सलामीवीर म्हणून रोहित शर्मा सर्वात जलद ८००० धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला –

या सामन्यात रोहित शर्माने ४४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील ५१ वे अर्धशतक आहे. या खेळीच्या जोरावर रोहित शर्माने सलामीवीर म्हणून आपल्या ८००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्याचबरोबर तो सर्वात जलद ८००० धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने एकदिवसीय सामन्यातील १६० डावांत हा कारनामा केला आहे. या बाबतीत त्याने हाशिम आमलाचा ​​विक्रम मोडला. आमलाने १७३ डावात ही कामगिरी केली होती. तर सचिन तेंडुलकरने १७९ डावात ही कामगिरी केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shadab khan completed 200 wickets in international cricket by taking the wicket of rohit sharma vbm