यूएईमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जातोय. या सामन्यात पहिल्या षटकापासूनच अटीतटीची लढत होताना दिसत आहे. नाणेफेक जिंकत पाकिस्तानने सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा हा निर्णय योग्य ठरला. कारण श्रीलंकेचे खेळाडू ठराविक अंतरावर बाद होत गेले आणि २० षटकांत श्रीलंकेला १७० धावा करता आल्या. आशिया चषकातील हा अंतिम सामना असल्यामुळे दोन्ही बाजूंनी तेवढाच दबाव आहे. मात्र या सामन्यात प्रत्यक्ष मैदानावर पाकिस्तानी खेळाडू थट्टा मस्करी करताना दिसले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> PAK vs SL Final Match : तो अवघा १९ वर्षांचा, पण श्रीलंकेच्या दिग्गजाला दाखवलं अस्मान; बघता बघताच दांडी गुल!

पाकिस्तानच्या हरिस रौफने टाकलेल्या एका चेंडूनंतर शादाब खानने पंचासोबत चांगरीच थट्टा मस्करी केली. हरिस रौफ फेकलेल्या चेंडूला भानुका राजपक्षेने टोलवण्याचा प्रयत्न केल्यानंतर पाकिस्तानी संघाने तो पायचित असल्याचा दावा करत अपिल केले. त्यानंतर डीआरएही घेतला. मात्र थर्ड अंपायरच्या मदतीने तपासून पाहिल्यावर भानुका राजपक्षे नाबाद असल्याचे समोर आले. याच वेळी शादाब खान पंचासोबत मस्करी करताना दिसला. थर्ड अंपायरकडून राजपक्षे नाबाद असल्याचा निर्णय आल्यानंतर शादाबने मैदानावरील पंचाचा हात पकडून बाद द्या असे गमतीत म्हटले. शादाबच्या या कृतीनंतर पंचालाही हसू फुटले. दोघेही मैदानावरच हसू लागले.

हेही वाचा >>> आशिया चषकातून भारत बाहेर पडल्यानंतर रोहित शर्मा काय करतोय? दुबईतील पंचतारांकित हॉटेलमधील फोटो आला समोर

दरम्यान, शादाबच्या या कृतीनंतर समाजमाध्यमावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. शादाब चिटिंग करण्याचा प्रयत्न करतोय, असे अनेकांनी मस्करीत म्हटले आहे. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाने वीस षटाकातं १७० धावा केल्या. ही धावसंख्या उभारताना भानुका राजपक्षेने आक्रमक फलंदाजी केली. त्याने ४५ चेंडूंमध्ये नाबाद ७१ धावा केल्या. त्यानंतर वानिंदू हसरंगानेही राजपक्षेला साथ दिली. त्याने २१ चेंडूंमध्ये ३६ धावा केल्या. तर पाकिस्तानी संघाने सुरुवातीला गोलंदाजीचा निर्णय घेत उत्तम सुरुवात केली. पाकिस्तानाला पहिल्याच षटकात पहिला बळी मिळाला. त्यानंतर चौथ्याच षटकात पाकिस्तानला दुसरा बळी मिळाला. वेगवान गोलंदाज हरिस रौफ यानेही उत्तम कामगिरी केली. त्याने सर्वाधिक तीन गडी बाद केले.