Shadab Khan on Ajit Agarkar: जरी आशिया चषक २०२३ हा ३० ऑगस्टपासून सुरू होत असला, परंतु तरी सर्वांच्या नजरा या २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मोठ्या लढतीकडे लागल्या आहेत. या मोठ्या सामन्यासाठी सर्वांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सीमेच्या दोन्ही बाजूला या हायव्होल्टेज सामन्याची जोरदार चर्चा आहे. त्याचबरोबर टीम इंडियाच्या १७ सदस्यीय संघाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयचे निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानी गोलंदाजीबाबत मोठे वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या विराट कोहलीच्या वक्तव्यावर शादाब खानने खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरेतर, जेव्हा आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला, तेव्हा अजित आगरकर यांना पाकिस्तानचा प्रतिष्ठित वेगवान आक्रमण हाताळण्याबाबत विचारण्यात आले. अशा स्थितीत आगरकर यांनी भारताचे रन मशिन विराट कोहलीचे नाव अभिमानाने घेतले आणि “आपण त्यांना हाताळू शकतो,” असे सांगितले. आता, पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खान याने आगरकर यांच्या या दाव्यावर प्रतिक्रिया दिली असून, तो म्हणाला की, “मैदानावर काय होते हे महत्त्वाचे आहे आणि सामन्यापूर्वी किंवा नंतर काय बोलले याने काही फरक पडत नाही.”

शादाब खानने अजित आगरकर यांना दिले प्रत्युत्तर

२०२२ टी२० विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील सामन्यात भारताच्या विजयात कोहलीचा मोलाचा वाटा होता, त्याने त्याच्या ८२ धावांच्या अविश्वसनीय खेळीने सर्वांची मने जिंकली. किंग कोहली आगामी आशिया चषकातही अशीच कामगिरी करेल अशी चाहत्यांची अपेक्षा असताना, काय होते ते त्या दिवशीच कळेल असे शादाबला वाटते.

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया कपमध्ये टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर कशी असेल? श्रेयस अय्यर, विराट, के. एल. राहुल कुठे खेळणार? जाणून घ्या

खरे तर, आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला तेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनाही पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाबाबत विचारणा करण्यात आली होती. आगरकरने उत्तर दिले की, “विराट कोहली त्याची काळजी घेईल.”

यावर शादाब खानने उपरोधिक प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की “हे बघ, तुम्ही त्या दिवशी कसे खेळता यावर सर्व काही अवलंबून आहे. मी किंवा इतर कोणी किंवा त्यांच्या वतीने असे काही बोललो, तर ते चुकीचे ठरेल. नुसतं बोलून काहीही होत नाही करून दाखवावं लागत. त्यांच्या अशा विधानाने काहीही फरक पडत नाही. सामन्यात जे काय होईल ते, त्या दिवशी मॅचमध्ये पाहिले जाईल.” पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना शादाब म्हणाला की, “मॅचच्या दिवशीच समजेल की खरी वस्तुस्थिती काय आहे ते.”

हेही वाचा: World Athletics Championships: भारताने अ‍ॅथलेटिक्समध्ये रचला इतिहास; पुरुष संघ 4×400 रिलेमध्ये फायनलला पोहोचला, मोडला आशियाई विक्रम

एकदिवसीय मालिकेत अफगाणिस्तानचा ३-० असा व्हाईटवॉश करणाऱ्या पाकिस्तान संघातील शादाब हा महत्त्वाचा खेळाडू आहे. या मालिकेतील विजयासह पाकिस्तान आता वन डे क्रिकेटमध्ये क्रमांक 1चा संघ बनला आहे. भारत त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shadab khan reacts to ajit agarkars virat will manage statement said nothing happens with speaking avw
Show comments