पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आणि उपकर्णधार शादाब खान यांचे एकमेकांशी चांगले नाते आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये खूप चांगले संबंध आहेत, हे सिद्ध करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. वास्तविक या व्हायरल व्हिडिओमध्ये शादाब खान, बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी एकत्र दिसत आहेत. दरम्यान, बोलताना शादाब म्हणतो की, ‘बाबर आझम असो किंवा सरफराज भाई, जेव्हा कुणालाही रागवायचे असते, तेव्हा ते आधी माझ्यावरच रागवतात.’
व्हिडिओमध्ये उपकर्णधार शादाब खानने बाबर आझम आणि माजी कर्णधार सरफराज यांच्यातील साम्य कॅमेरासमोर सांगितले आहे. तो हसतो आणि म्हणतो, ”दोन्ही कर्णधारांमध्ये एक गोष्ट साम्य आहे, ते माझ्यावरच रागवतात. तिथे फहीम होता, हसन होता, फखर भाई होता, आसिफ भाई होता… जेव्हा त्यांना रागवायचे असते, तेव्हा ते आधी माझ्यावरच रागवतात. आता बाबरही तेच करतो. ज्याला कोणाला रागवायचे आहे, तोही आधी माझ्यावरच रागवतो. ही दोघांमधील साम्य असणारी गोष्ट आहे.”
मी सैफी भाईकडून शिकलो – बाबर आझम
बाबर आझम यांनीही बोलताना शादाबला योग्य मानले. तो म्हणाला, ”हा योग्य बोलत आहे कारण हाच ओरडा खात असतो. कारण जास्त बहुतेक लोक याच्या जवळचे आहेत. आम्ही ही गोष्ट सैफी भाई (सरफराज) कडून शिकलो आहोत. तो आम्हाला खवळायचा, आमच्या जवळचे लोक त्याला समजावून सांगायचे. इमाममुळे मला खूप ओरडा बसला आहे.”
टी-२० विश्वचषक २०२२ संपल्यानंतर पाकिस्तान आता इंग्लंडसोबत तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. यजमान पाकिस्तानने मालिकेतील पहिला सामना गमावला आहे. रावळपिंडी कसोटीत बाबर आझमच्या संघाचा ७४ धावांनी पराभव झाला. आता मालिकेतील दुसरा सामना मुलतानमध्ये ९ डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. हा सामना पाकिस्तानसाठी जिंकणे आवश्यक आहे.