Shafali Verma Fastest Fifty In WPL 2023 : नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात महिला प्रीमियर लीगचा नववा सामना रंगला. दिल्लीच्या भेदक गोलंदाजीमुळं गुजरातला २० षटकांत ९ बाद १०५ धावांवरच मजल मारता आली. पण त्यानंतर १०६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या सलामी जोडीनं म्हणजेच शफाली वर्मा आणि कर्णधार मेग लॅनिंगने धडाकेबाज फलंदाजी केली. शफालीने गुजरातच्या गोलंदाजांना घाम फोडत २८ चेंडूत ७६ धावांची आक्रमक खेळी केली. शफालीने मैदानात चौफेर फटकेबाजी करत १९ चेंडूत अर्धशतक ठोकलं. यामध्ये १० चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे. शफालीच्या धडाकेबाज फलंदाजीचा व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाला असून नेटकरी कौतुकाच वर्षाव करत आहेत.

दिल्ली कॅपिटल्सने ७.१ षटकात १०७ धावा करून गुजरात जायंट्सवर एकतर्फी विजय मिळवला. सलामीला आलेल्या शफाली आणि मेगने विजयी सलामी देऊन गुजरातचा पराभव केला. शफालीने चारही दिशेला मोठे फटके मारून गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. गुजरातने शफाली वर्माला बाद करण्यासाठी अनेक डावपेच आखले, पण त्यांच्या गोलंदाजांना शफालीला बाद करण्यात यश आलं नाही. कर्णधार मेग लॅनिंगनेही १५ चेंडूत २१ धावा कुटल्या. पॉवर प्ले मध्येच या सलामी जोडीनं गुजरातच्या गोलंदाजीवर आक्रमक फटके मारायला सुरुवात केली. शफाली वर्माने वेगवान अर्धशतर झळकावत दिल्लीच्या संघाला विजयाच्या जवळ नेलं.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…

नक्की वाचा – अहमदाबाद कसोटी सामना रद्द झाल्यास टीम इंडियाचं काय होणार? ‘असं’ असेल WTC फायनलचं संपूर्ण गणित

इथे पाहा व्हिडीओ

दरम्यान, गुजरातसाठी मैदानात फलंदाजीला उतरलेल्या सबिनेनी मेघनाला भोपळाही फोडता आला नाही. लॉरा वॉलवर्थने फक्त एक धाव केली. कारण मारिझान कापने या दोन्ही फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या. त्यानंतर हरलीन देओलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हरलीनने १४ चेंडूत २० धावा केल्या. पण मारिझानने हरलीनला पायचीत करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर शिखा पांडेच्या गोलंदाजीवर दयालन हेमलता ५ धावांवर असताना बाद झाली. तसंच कापच्या शेवटच्या षटकात सुष्मा वर्माची दांडी गुल झाली. सुष्माने १० चेंडूत फक्त २ धावा केल्या. जॉर्जिया वॅरेहमने २५ चेंडूत २२ धावा केल्या. दिल्लीच्या राधा यादवने जॉर्जीयाला क्लीन बोल्ड केलं. तसंच गुजरातची कर्णधार स्नेह राणा शिखा पांडेच्या गोलंदाजीवर बाद झाली.

Story img Loader