WPL 2024 Opening Ceremony Updates : महिला प्रीमियर लीगचा (डब्ल्यूपीएल) दुसरा हंगाम २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील स्पर्धेतील पहिला सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआय एक शानदार उद्घाटन सोहळा आयोजित करणार आहे. त्यात बॉलिवूडचे स्टार्स परफॉर्म करणार आहेत. अभिनेता शाहरुख खानही उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म करणार आहे. त्याच्यासोबत चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकार रसिकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता उद्घाटन सोहळा सुरू होईल. यामध्ये कार्तिक आर्यन, टायगर श्रॉफ, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि शाहिद कपूर परफॉर्म करणार आहेत. गेल्या वेळी, कियारा अडवाणी आणि क्रिती सेनॉन सारख्या स्टार्सने उद्घाटन समारंभात परफॉर्म केले होते. त्याचवेळी गायक एपी धिल्लन यांनी आपल्या गाण्यांनी चाहत्यांची मने जिंकली होती.

ही स्पर्धा दोन शहरांमध्ये खेळवली जाणार –

डब्ल्यूपीएलचा दुसरा हंगाम २३ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही एकूण पाच संघ २२ सामने खेळणार आहेत. मात्र, यावेळी मोठा बदल दिसून आला आहे. वास्तविक, गेल्या वर्षी ही लीग मुंबई आणि नवी मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवण्यात आली होती. मात्र, यावेळी या लीगचे यजमानपद मुंबईऐवजी बंगळुरू आणि दिल्लीला देण्यात आले आहे.

हेही वाचा – ‘मी माझ्या कारकिर्दीत इतके षटकार मारले नाहीत, जितके यशस्वीने…’ इंग्लंडच्या माजी कर्णधाराकडून कौतुक

फायनल दिल्लीत होणार –

स्पर्धेतील पहिले ११ सामने बंगळुरू येथे खेळवले जातील. यानंतर, पाचही संघ दिल्लीला येतील, जिथे एलिमिनेटरसह अंतिम सामना खेळला जाईल. साखळी फेरीत २० सामने खेळवले जातील आणि त्यानंतर एलिमिनेटर आणि अंतिम सामने खेळवले जातील. साखळी फेरीत अव्वल असणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे संघ एलिमिनेटर खेळतील. २४ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकही डबल हेडर सामना खेळला जाणार नाही. दररोज एकच सामना होईल. १५ मार्चला एलिमिनेटर आणि १७ मार्चला अंतिम सामना दिल्लीत खेळवला जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan varun dhawan siddharth malhotra karthik and tiger shroff to perform at wpl 2024 opening ceremony vbm