England vs Pakistan ICC Cricket World Cup 2023 Match Updates: इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या शेवटच्या साखळी सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने १० षटकात ७२ धावा देत २ विकेट्स घेतल्या. या २ विकेट्ससह, शाहीन आफ्रिदीने विश्वचषकातील ९ साखळी सामन्यांमध्ये एकूण १८ विकेट्स घेतल्या. तो या विश्वचषकात पाकिस्तानसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. या हंगामात १८ विकेट्स घेत शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानचा विक्रम मोडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहीन आफ्रिदीने मोडला इम्रान खानचा विक्रम –

शाहीन आफ्रिदीने एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये खेळल्या गेलेल्या ९ साखळी सामन्यांमध्ये १८ विकेट्स घेतल्या. त्याची सर्वोत्तम कामगिरी ५४ धावांत ५ विकेट्स होती. या मोसमात १८ विकेट्स घेऊन, त्याने इम्रान खानला मागे टाकले. त्याचबरोबर पाकिस्तानसाठी एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी पोहोचला. त्याने इम्रान खान, सकलेन मुश्ताक आणि मोहम्मद आमिर मागे टाकले. या तीन गोलंदाजांनी विश्वचषकाच्या एका मोसमात पाकिस्तानसाठी १७-१७ विकेट घेतल्या होत्या. पाकिस्तानसाठी विश्वचषकाच्या एकाच मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज शाहिद आफ्रिदी होता, ज्याने २०११ मध्ये एकूण २१ विकेट्स घेतल्या होत्या.

एका विश्वचषकात पाकिस्तानसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –

२१ – शाहिद आफ्रिदी (२०११)
१८ – वसीम अक्रम (१९९२)
१८ – शाहीन आफ्रिदी (२०२३)
१७ – इम्रान खान (१९८७)
१७ – सकलेन मुश्ताक (१९९९)
१७ – मोहम्मद आमिर (२०१९)

हेही वाचा – AUS vs BAN: मिचेल मार्शच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा उडवला धुव्वा, ८ गडी राखून नोंदवला विजय

शाहीनने इम्रान खानच्या विक्रमाशी केली बरोबरी –

शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानसाठी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत एकूण ३४ विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तानसाठी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो इम्रान खानसह संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे इम्रान खानने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून खेळताना एकूण ३४ विकेट्स घेतल्या होत्या. पाकिस्तानकडून वसीम अक्रम या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असून त्याने सर्वाधिक ५५ विकेट्स घेतल्या होत्या.

एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –

५५ – वसीम अक्रम
३५ – वहाब रियाझ
३४ – इम्रान खान
३४ – शाहीन आफ्रिदी

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shaheen afridi broke imran khans record as the highest wicket taker for pakistan in world cup 2023 vbm
Show comments