Shaheen Afridi marries Ansha Afridi: पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सध्याच्या गोलंदाजीतील महत्त्वाचा दुवा मानला जाणारा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी विवाहाने आपल्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. शाहीन शाह आफ्रिदीचे लग्न कराचीमध्ये झाले होते ज्यात सध्याचा कर्णधार बाबर आणि माजी कर्णधार सरफराज अहमद, नसीम शाह यांच्यासह संघातील अनेक खेळाडू सामील झाले होते. उल्लेखनीय आहे की शाहीन शाह आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी निवडकर्ता आणि माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची मोठी मुलगी अंशा आफ्रिदीशी लग्न केले आहे. मात्र ती आफ्रिदीची नेमकी कितवी मुलगी होती यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहेत.
डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी २२ वर्षांचा आहे आणि त्याने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्याने अनेक मोठ्या स्पर्धा आणि सामन्यांमध्ये आपले दबदबा पसरवला आहे. काल त्याचे पाकिस्तानचाच अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या एका मुलीशी लग्न केले. मात्र आतापर्यंतच्या सर्व फोटोंमध्ये व्हायरल होणारी जी मुलगी होती ती भलतीच निघाली. नक्की शाहिद आफ्रिदीच्या कोणत्या कितव्या आणि कोणत्या मुलीशी लग्न शाहीनने केले असा प्रश्न लोकांना पडला आहे.
अंशा आफ्रिदीसोबत लग्न केले
आतापर्यंत शाहिद आफ्रिदीच्या ज्या मुलीसोबत शाहीन लग्न करणार आहे, असे फोटो व्हायरल झाले होते ती नवरी म्हणून लग्नात उभी राहिलीच नाही. शाहीनची अंशा कुणीतरी दुसरीच निघाली. उल्लेखनीय आहे की शाहीन शाह आफ्रिदीच्या लग्नाच्या कार्डचे काही फोटो सोशल मीडियावर बरेच दिवस फिरत होते, ज्यात दावा केला जात होता की शाहीन आणि अंशाचा मेहंदी सोहळा गुरुवारी झाला. रिपोर्ट्सनुसार, हे लग्न आदिवासी रितीरिवाजांनुसार पार पडले, ज्यामध्ये कुटुंबासह काही खास मित्र आणि टीममेटही दिसले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम व्यतिरिक्त मोहम्मद हाफीज, शादाब खान, नसीम शाह, हारिस रौफ आणि सरफराज अहमद हे देखील लग्नात दिसले होते.
दोन महिन्यात या क्रिकेटपटूंचे झाले शुभमंगल सावधान
भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेटमध्ये सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. गेल्या एक-दोन महिन्यांत भारतीय-पाकिस्तान संघातील ५ स्टार क्रिकेटपटूंनी लग्नगाठ बांधली आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हारिस रौफने मॉडेल मुजना मसूदशी लग्न केले. यानंतर पाकिस्तानी फलंदाज शान मसूदने दीर्घकाळाची गर्लफ्रेंड निशा खानसोबत लग्न केले. तर शादाब खानने पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांच्या मुलीशी विवाह केला.
मग एक दिवस आला जेव्हा भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेटमधील खेळाडूंची शहनाई एकत्र वाजली. भारतीय खेळाडू केएल राहुल आणि पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू शादाब खान यांचा २३ जानेवारी रोजी विवाह झाला. राहुलने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत साताजन्माची लग्नगाठ बांधली. यानंतर भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने २६ जानेवारीला मेहा पटेलसोबत लग्न केले.