पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी तिरंगी मालिका खेळवली जात आहे. ज्यामध्ये पाकिस्तानसह न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा संह सहभागी झाला आहे. पण पाकिस्तान वि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये वाद झालेला पाहायला मिळाला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज मॅथ्यू ब्रिट्झकेबरोबर वाद घातला. शाहीन आफ्रिदीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहीन आफ्रिदी या व्हिडिओमध्ये प्रथम या युवा फलंदाजाशी वाद घालतो आणि नंतर धावा काढताना त्याच्यामध्ये अडथळा घालतो. या घटनेनंतर मैदानावर दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. परिस्थिती अशी होती की कधीही हाणामारी होऊ शकते, परंतु खेळाडू आणि पंचांनी हस्तक्षेप केला.

२८व्या षटकात आफ्रिदी आणि मॅथ्यू ब्रिट्झके यांच्यात वाद झाला. शाहीन आफ्रिदीच्या पाचव्या चेंडूवर मॅथ्यू ब्रिट्झकेने मिड-ऑन एरियामध्ये फटका खेळला. यानंतर ब्रिटझेकेने हवेत बॅट उगारली, तितक्यात आफ्रिदी मॅथ्यू ब्रिट्झकेला काहीतरी म्हणाला. दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजावर शाहीन रागावला होता कारण तो एक-दोनदा खेळपट्टीच्या मधोमध धावला होता.

त्यानंतर आफ्रिदी वैतागून त्याला काहीतरी म्हणाला, यावर मॅथ्यू ब्रिट्झकेने त्याला प्रत्युत्तर दिले. यानंतर पुढच्या चेंडूवर मॅथ्यू ब्रिट्झकेने एक धाव घेतली आणि तो धावत असतानाच आफ्रिदी त्याच्यामध्ये आला आणि तो त्याच्या पायात अडकून पडता पडता थोडक्यात वाचला. यानंतर दोघांमध्ये नॉन स्टाईकर एंडला वाद झाला. शाहीन ब्रिटझकेच्या जवळ जाऊन त्याच्याशी वाद घालत होता. प्रकरण इतकं तापलं की पंचांना मध्यस्थी करावी लागली. हे प्रकरण शांत करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा आणि मोहम्मद रिझवानही मध्ये आले.

ब्रिट्झके अखेरीस खुशदिल शाहच्या गोलंदाजीवर ८३ धावांवर बाद झाला. त्यावेळेस दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ३ बाद २८३ होती. फक्त दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या ब्रिट्झकेचे वनडे क्रिकेटमधील सलग दुसरे शतक हुकले. ब्रिट्झके दहा चौकार आणि एका षटकारासह ८३ धावा करत बाद झाला. २६ वर्षीय ब्रिटझकेने न्यूझीलंडविरुद्धच्या मागील सामन्यात इतिहास लिहिला होता. त्याने त्याच्या वनडे पदार्पणातच ५० धावा करत आजवरची पदार्पणातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती.