IND vs PAK, World Cup 2023: यावेळी २०२३मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताला मिळाले ही स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. दुसरीकडे, १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाहायला मिळणार आहे. विश्वचषकातील भारत-पाक सामन्याबाबत पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने मोठे विधान केले आहे. त्याच्यामते “केवळ या सामन्यावर लक्ष केंद्रित करू नये”, असे त्याने संघाला सांगितले आहे.
पाकिस्तान क्रिकेटच्या म्हणण्यानुसार शाहीन आफ्रिदीने एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत भारतात होणाऱ्या विश्वचषक आणि भारत-पाक सामन्याबद्दल सांगितले. शाहीन म्हणाला, “आम्हाला विचार करणे थांबवावे लागेल आणि फक्त भारताविरुद्धच्या सामन्यावर लक्ष केंद्रित करून चालणार नाही, कारण हा फक्त एक सामना असेल. आम्ही विश्वचषक कसा जिंकायचा यावर आम्हाला प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले पाहिजे, एक संघ म्हणून ते आमचे ध्येय असले पाहिजे.”
पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाने त्याच्या फिटनेसबद्दल पुढे सांगितले. कारण, शाहीनचा फिटनेस काही दिवसांपासून चर्चेत आहे. तो नेहमी संघातून आत-बाहेर येत जात असतो. शाहीन पुढे म्हणाला, “मी आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे, त्यामुळेच मी कसोटी संघात पुनरागमन केले. जर मी पूर्णपणे तंदुरुस्त नसतो तर मी कसोटी संघाचा भाग नसतो. कोणत्याही क्लब स्तरावरील संघासाठी नाही मी पाकिस्तानसाठी सामने खेळायला जात आहे.”
माहितीसाठी की, पाकिस्तानचा संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना १६ ते २० जुलै, तर दुसरा कसोटी सामना २४ ते २८ जुलै दरम्यान खेळवला जाईल. मालिकेतील पहिली कसोटी गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. दुसरा सामना कोलंबो येथील सिंहली स्पोर्ट्स क्लबमध्ये होणार आहे. या सामन्यांपूर्वी पाकिस्तान संघ ११ आणि १२ जुलै रोजी दोन दिवसीय सराव सामना खेळणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ सायकलमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा प्रवास अशा प्रकारे सुरू होईल.
श्रीलंका दौऱ्यासाठी पाकिस्तानचा कसोटी संघ
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (उपकर्णधार आणि विकेटकीपर), अमीर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, हसन अली, इमाम-उल-हक, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद नवाज, नसीम शाह, नोमान अली, सलमान अली आगा, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), सौद शकील, शाहीन आफ्रिदी, शान मसूद.