NZ vs PAK, Shaheen Afridi: पाकिस्तान क्रिकेट संघ नेहमीच आपल्या वेगवान गोलंदाजांमुळे चर्चेत असतो. मात्र नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांच्या घटत्या वेगावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दरम्यान, शाहीन आफ्रिदीने या प्रश्नांची उत्तरे देताना सांगितले की, “मी स्वत: आणि इतर गोलंदाजांचा वेग कमी झाल्याने आश्चर्यचकित झालो आहे.”

शाहीन आफ्रिदीने न्यूझीलंडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “खरे सांगायचे तर, आम्ही स्वत: ओ मीटरचा वेग पाहत होतो आणि ते पाहून आश्चर्यचकित झालो. आमचा वेग खरोखरच कमी झाला आहे का? कारण खूप प्रयत्न करूनही वेग वाढत नव्हता हे आम्हाला समजत नव्हते. १३०-१३२ प्रती/किमी पाहणे निराशाजनक आहे. आम्ही १३० प्रती/किमीपेक्षा जास्त जाणार नाही, हे आधीच ठरवले होते का याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटले.”

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
IND vs AUS Sourav Ganguly Says Rohit Sharma should be playing the Perth Test
IND vs AUS : ‘… तर रोहित पुन्हा कधीही ऑस्ट्रेलियाला जाणार नाही’, सौरव गांगुलीचे हिटमॅनबद्दल मोठं वक्तव्य
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी

पाकिस्तानच्या कर्णधाराने त्या स्पीडो मीटरला दोष दिला आहे. शाहीन आफ्रिदी पुढे म्हणाला, “या घसरणीला अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. गोलंदाज दुखापती टाळण्यासाठी वर्कलोडचे व्यवस्थापन करत आहेत. त्या प्रक्रियेत काही जण वेगवान गोलंदाजी करत नाहीत. तसेच, सतत जर १३० किमी/प्रती तास दाखवत असतील तर, त्यात काही दोष असू शकतो. पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज त्यांच्या गोलंदाजीवर अधिक काम करत आहेत.”

हेही वाचा: IND vs AFG 1st T20: यशस्वी की शुबमन? पहिल्या टी-२० मध्ये रोहित शर्माबरोबर कोण सलामीला येणार? जाणून घ्या संभाव्य प्लेईंग-११

पाकिस्तानची वेगवान गोलंदाजी फार पूर्वीपासून अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे. इम्रान खान आणि वसीम अक्रमपासून ते शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस रौफ यांच्या सध्याच्या पिढीपर्यंत, वेगवान गोलंदाजी हा पाकिस्तानी क्रिकेटचा अविभाज्य भाग आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेने दर्जेदार गोलंदाजांची उणीव उघडकीस आली असून पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांच्या कमतरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

शाहीनच्या नेतृत्वाखाली संघ ऑकलंडला पोहोचला

वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली संघ आगामी दौऱ्यासाठी ऑकलंडला पोहोचला आहे. पाकिस्तानने नुकताच ऑस्ट्रेलिया दौरा पूर्ण केला आहे. या काळात संघाला कसोटी मालिकेत ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याच वेळी, आता टी-२० संघाचे सदस्य सिडनीहून थेट न्यूझीलंडला पोहोचले आहेत.

हेही वाचा: Steve Smith: ऑस्ट्रेलियन ओपनआधी स्टीव्ह स्मिथ दिसला नोवाक जोकोविचबरोबर टेनिस खेळताना, Video व्हायरल

गेल्या वर्षभरापासून पाकिस्तानची कामगिरी फारशी प्रभावशाली नाही. आशिया चषकानंतर एकदिवसीय विश्वचषक आणि त्यानंतर कसोटी मालिका गमावल्यामुळेही संघाला टीकेला सामोरे जावे लागले आहे. मात्र, दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने तिन्ही फॉरमॅटच्या संघात बरेच बदल केले आहेत, ज्यामध्ये बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवणे महत्त्वाचे होते. आता शाहीन आफ्रिदीचा टी-२० कर्णधार म्हणून हा पहिलाच दौरा असेल. पाकिस्तानचा संघ १२ ते २१ जानेवारी दरम्यान न्यूझीलंड दौऱ्यावर असेल. येथे दोघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. छोट्या फॉरमॅटमध्ये पाकिस्तान संघाची कमान शाहीन आफ्रिदीकडे आहे, तर अनुभवी रिझवानकडे संघाचे उपकर्णधार असेल.