Shaheen Afridi’s Best Spell Is Yet To Come: भारत आणि पाकिस्तानचे संघ रविवारी पुन्हा एकदा सुपर फोर सामन्याच्या निमित्ताने आमनेसामने येणार आहेत. यापूर्वी भारत आणि पाकिस्तान साखळी फेरीत आमनेसामने आले होते. मात्र हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. मात्र, भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने आपले मत मांडले आहे. तो म्हणाला की भारताविरुद्ध एक विशेष सामना आहे. कारण मोठ्या संख्येने लोक हा सामना पाहतात. अंडर-१६ च्या आधीपासून मी भारत-पाकिस्तान सामन्याचा मोठा चाहता आहे.
पहिल्या सामन्यात एक मोठी गोष्ट समोर आली, ती म्हणजे पाकिस्तानच्या वेगवान आक्रमणासमोर भारतीय आघाडीचे फलंदाज पूर्णपणे हताश दिसले. या सामन्यात पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी भारताकडून सर्व १० विकेट घेतल्या होत्या, ज्यात शाहीन आफ्रिदी सर्वाधिक ४ विकेट्स घेऊन सर्वात यशस्वी ठरला होता, तर हरिस रौफ आणि नसीम शाह यांना ३-३ विकेट्स मिळाल्या होत्या.
भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने १० षटकात ३५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. शाहीनने भारताविरुद्ध शानदार गोलंदाजी केली होती, पण त्याचे सर्वोत्तम कामगिरी येणे अजून बाकी आहे. असे तो म्हणतो. सुपर फोर सामन्यातही भारतासमोर शाहीन आफ्रिदीचे सर्वात मोठे आव्हान असेल. वृत्तसंस्था एएफपीशी बोलताना शाहीनने सांगितले की, “भारताविरुद्धचा प्रत्येक सामना खास असतो आणि लोकांना हा सामना पाहायला आवडतो. अंडर-१६ खेळण्यापूर्वी मी या सामन्याची (भारत-पाकिस्तान) आतुरतेने वाट पहायचो.”
हेही वाचा – IND vs PAK सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याचे मोठं वक्तव्य; म्हणाला, “मला इतर खेळाडूंपेक्षा दुप्पट…”
शाहीन आफ्रिदी पुढे म्हणाला की, “भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात मी टाकलेला गोलंदाजी स्पेल सर्वोत्तम नव्हता. ही फक्त सुरुवात आहे आणि माझे सर्वोत्तम येणे बाकी आहे. तुम्ही पाकिस्तानसाठी क्रिकेटचे तिन्ही फॉरमॅट खेळत असाल आणि नव्या चेंडूने सुरुवात केली, तर तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत.”
हेही वाचा – Asia Cup 2023: “माझा विश्वास आहे की, फक्त…”; IND vs PAK सामन्यापूर्वी कर्णधार बाबर आझमचे मोठं वक्तव्य
शाहीनने पुढे सांगितले की, “आम्हाला माहित आहे की, नवीन आणि जुन्या चेंडूने संघासाठी कोणत्या प्रकारची भूमिका बजावायची आहे. हरिस आमच्यापेक्षा वेगवान आहे. तो त्याच्या वेगाचा मोठा प्रभाव पाडतो. नसीम आणि मी लवकर विकेट घेण्याचा प्रयत्न करतो.”