पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका गुरुवारी (१ डिसेंबर) रावलपिंडी याठिकाणी सुरू झाली. इंग्लंडचा कोसटी संघ तब्बल १७ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आल्यामुळे या मालिकेचे महत्व अधिकच वाढले आहे. सामना सुरू होण्यापूर्वी इंग्लंड संघाने रावलपिंडीमध्ये सराव केला. त्यादरम्यान पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने भारत-पाकिस्तान मधील मिळणाऱ्या मान सन्मानाबद्दल मोठे भाष्य केले आहे.
दरम्यान, इंग्लंड संघाला कसोटी सामन्यापूर्वी संसर्गजन्य विषाणूचा फटका बसला. संघातील अनेक खेळाडूंना याची लागण झाली. मात्र याचा सामन्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या सामन्याचे संपूर्ण मानधन हे पाकिस्तानातील पूरग्रस्तांसाठी देणार असल्याची घोषणा केली. बेन स्टोक्सच्या या कृतीचे पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि आक्रमक फलंदाज शाहिद आफ्रिदीने देखील त्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
बेन स्टोक्सने केलेल्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आफ्रिदी म्हणाला की, ‘मी अशा कृतीचे नेहमीच समर्थन करत असतो. ज्यावेळी आम्ही २०११ साली ५० षटकांचा विश्वचषक खेळण्यासाठी भारतात गेलो होते त्यावेळी मी संघाचा कर्णधार होतो. त्याचवेळी मी म्हणालो होतो की भारतात जेवढा आदर आम्हाला मिळाला तेवढा पाकिस्तानात देखील मिळत नाही. हा एक सकारात्मक संदेश होता. त्यावेळीची भारतातील परिस्थीती देखील पोषक होती. आम्ही भारतात जावे की नाही याबाबत शंका होती पण भारतीय लोक हे खूप प्रेमळ आहेत. आता तसे वातावरण आहे का? याबाबत मला शंका आहे. एक खेळाडू म्हणून संपूर्ण जग तुमच्याकडे बघत असतं. त्यावेळी तुम्ही तुमच्या देशाचे रेप्युटेशन चांगले ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न करता.”
शाहिद आफ्रिदी पुढे बोलताना म्हणाला की, “ बेन स्टोक्सची कृती ही त्याच्यातील संस्कार दाखवते आणि यावरून तुमचा देश हा जगात ओळखला जातो. त्याने मानवतेसाठी हा एक खूप चांगला संदेश दिला आहे. अशा गोष्टा सातत्याने घडल्या गेल्या पाहिजेत. फक्त पाकिस्तानात नव्हे तर इतर देशातही आणि सर्व प्रकारच्या खेळांमध्ये आपुलकी आणि प्रेमाची भावना असणे गरजेचे आहे. खेळाडूंमध्ये खूप मैत्रीपूर्ण वातावर तयार व्हायला हवे. त्यांना आता एकच ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळत आहे.”
ऑस्ट्रेलियात झालेल्या टी२० विश्वचषकाआधी इंग्लंडने पाकिस्तानचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी टी२० सामन्यांची मालिका खेळली होती. या दोन्ही संघातच टी२० विश्वचषकाची अंतिम फेरीतील सामना सुद्धा या दोन संघांमध्ये झाला होता आणि त्यात इंग्लंड विजयी विश्वविजेते ठरले. आता पाकिस्तान दौऱ्यात पहिला कसोटी सामना रावळपिंडी येथे होणार आहे. तर दुसऱा सामना मुल्तान आणि तिसरा कराची येथे खेळवला जाणार आहे.