दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी संघात परतण्याची शक्यता आहे. कसोटी मालिकेत झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी पाकिस्तानच्या संघाने कंबर कसली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० दोन सामन्यांबरोबरच एकदिवसीय सामन्यांसाठी आफ्रिदीचा संघात समावेश करण्यात येणार आहे. आफ्रिदीबरोबरच उमर अकमल, कामरान अकमल, अहमद शाहझाद, वहाब रियाझ, शोएब मलिक आणि एझाझ चीमा, उमर अमीन आणि झुल्फिकर बाबर यांचाही संघात समावेश करण्यात येणार आहे.

Story img Loader