Shahid Afridi Praises Gautam Gambhir : पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीर यांच्यातील क्रिकेटच्या मैदानावरील नाते कुणापासून लपलेले नाही. मैदानावर दोन्ही खेळाडूंमध्ये अनेकवेळा जोरदार बाचाबाची झाली आहे. धावताना गंभीरला आफ्रिदीने कोपर मारणे असो किंवा गंभीरने आफ्रिदीशी केलेले गैरवर्तन असो. दोघांच्याही चर्चा सुरू झाल्या की, त्यांच्या क्लिप आजही सोशल मीडियावर व्हायरल होतात.
अलीकडेच जेव्हा आफ्रिदी एका यूट्यूब चॅनलवर मुलाखतीसाठी आला तेव्हा त्याने गंभीरसोबतच्या वादाबद्दल बोलण्यास नकार दिला. आफ्रिदी म्हणाला की, काही सकारात्मक गोष्टींवर बोला. याबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उधळण करण्यात आली आहे. आफ्रिदी पाकिस्तानचा प्रसिद्ध यूट्यूबर मोमीन साकिबच्या ‘हद कर दी’ या शोमध्ये आला होता. या शोमध्ये त्यांनी कार्यक्रमाचे अँकर मोमीन आणि उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधला.
यावेळी मोमीनने आफ्रिदीला गौतम गंभीरशी संबंधित प्रश्न विचारला. भारत-पाकिस्तान सामन्यात तुम्ही अनेकदा गौतम गंभीरला भडकवल्याचा तुमच्यावर आरोप आहे, असे त्यांनी विचारले. याला उत्तर देताना आफ्रिदी म्हणाला, “हा खेळाचा एक भाग आहे. प्रत्येक संघ दुसऱ्या संघातील खेळाडूंसोबत असे करतो. पण माझे आणि गंभीरचे प्रकरण सोशल मीडियावर वाढवून-चढवून दाखवण्यात आले आहे.” मात्र, यानंतर त्याने गंभीरवर केलेली टिप्पणी त्याच्या चाहत्यांना पटली नाही. तो म्हणाला, “गंभीरचे कॅरॅक्टरच असे आहे. त्याचे स्वतःच्या संघातील सहकारी खेळाडूंशीही असेच संबंध आहेत. या शोमध्ये काही सकारात्मक मुद्द्यांवर बोला.”
हेही वाचा – IND vs WI T20: निकोलस पूरनने हार्दिक पांड्याच्या आव्हानाला दिले चोख प्रत्युत्तर, पण अर्शदीप सिंगने दिला घाव
यानंतर मोमीन म्हणाला, ‘चला, तुम्ही मला गौतम गंभीरबद्दल काही सकारात्मक गोष्टी सांगा.’ यावर आफ्रिदी म्हणाला, “भारतीय संघात मी त्याच्यासारखा सलामीवीर क्वचितच पाहिला आहे. त्याची टायमिंग उत्तम होती. तो उत्कृष्ट सलामीवीर राहिला आहे.” या शोमध्ये आफ्रिदीने त्याच्या कारकिर्दीतील अनेक संस्मरणीय क्षणांसह आफ्रिदी संघातील त्याच्या आवडत्या खेळाडूंसह आपले मत मांडले आहे.