Pakistan champions beats Indian champions by 68 runs : बर्मिंगहॅममध्ये शनिवारी भारत चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स २०२४ चा सामना खेळला गेला. या सामन्यातही चाहत्यांची तीच उपस्थिती दिसली जी भारत विरुद्ध पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान पाहायला मिळते. हा हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी पाकिस्तान माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचा जावई आणि त्याची लेकही आली होती. तसेच बॉलीवूड अभिनेता अजय देवगणही भारतातून आला होता. या सामन्यात अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने आपल्या जावई आणि लेकीसमोर शानदार कामगिरी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स सामन्यासाठी शाहिद आफ्रिदी पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. असे असतानाही त्याने भारताविरुद्ध मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर त्याने टीम इंडियाविरुद्ध पाकिस्तान संघासाठी एकूण २ षटके टाकली. दरम्यान, त्याला एकही विकेट मिळाली नाही, परंतु या सामन्यात त्याने ४.५० च्या इकॉनॉमीसह केवळ ९ धावा केल्या. ज्याचा संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा ठरला.

या सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सने भारतीय चॅम्पियन्सचा ६८ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात भारत चॅम्पियन्सच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. या सामन्यात पाकिस्तानी चॅम्पियन्ससाठी फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. संघासाठी तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावत २४३ धावांची मोठी धावसंख्या उभारली. याला प्रत्युत्तर देताना भारतीय चॅम्पियन संघ केवळ १७५ धावाच करू शकला. या सामन्यात पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने शानदार कामगिरी केली.

हेही वाचा – IND vs ZIM 2nd T20I Live Score : भारत-झिम्बाब्वे पुन्हा आमनेसामने, टीम इंडिया पराभवाचा बदला घेणार?

सुरेश रैनाने भारतीय चॅम्पियन्ससाठी निश्चितपणे अर्धशतक झळकावले, पण तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. रैनाने ४० चेंडूत ५२ धावा केल्या. अंबाती रायुडूने ३९ धावांचे योगदान दिले. रॉबिन उथप्पाने २२ आणि अनुरीत सिंगने २० धावा केल्या. मात्र बाकीचे खेळाडू फारसे योगदान देऊ शकले नाहीत. त्यामुळे संघाला २० षटकांत १७५ धावा करता आल्या. पाकिस्तानकडून वहाब रियाझ आणि शोएब मलिक यांनी चांगली गोलंदाजी केली. या दोन्ही खेळाडूंनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. सोहेल खान आणि सोहेल तनवीर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

हेही वाचा – ‘स्वतः तर ट्रॉफी जिंकली नाही, भारताऐवजी आपल्या संघाला सांभाळा…’, रवी शास्त्रींचं मायकल वॉनला सडेतोड उत्तर

पाकिस्तान चॅम्पियन्सच्या ३ फलंदाजांनी झळकावली अर्धशतके –

कामरान अकमल आणि शर्जील खान यांनी पाकिस्तानच्या चॅम्पियनला झंझावाती सुरुवात करून दिली. कामरानने ४० चेंडूत ७७ तर शरजीलने ३० चेंडूत ७२ धावा केल्या. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या शोएब मकसूदने २६ चेंडूत ५१ धावा केल्या. शोएब मलिकने २५ धावांचे योगदान दिले. भारतीय चॅम्पियन्सकडून आरपी सिंग, अनुरीत सिंग, धवल कुलकर्णी आणि पवन नेगी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid afridi son in law and daughter attended the pakistan vs india champions match in wcll 2024 vbm
Show comments